![]()
समाज कल्याण विभागाच्या ‘निरीक्षक’ पदी मजल : सर्वत्र अभिनंदन

चंदगड : प्रतिनिधी
तालुक्यातील पोरेवाडी येथील वृषाली पाटील हिने समाज कल्याण विभागाच्या ‘निरीक्षक’ पदी मजल मारली असून जिद्द,चिकाटी व आपल्या एकाग्र बुद्धीमतेच्या जोरावर अभ्यास करून सामान्य कुटूंबातील वृषालीने सरकारी अधिकारी बनत एक नवा आदर्श युवा वर्गाला घालून दिला. पोरेवाडी येथील शेतकरी कुटुंबात वृषालीचा जन्म झाला. ती उत्तम पाटील यांची कन्या आहे. अत्यंत मेहनतीने यश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या निरीक्षक पदी निवड झाल्याने पोरेवाडी गावासह तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
वृषाली ही सामाजिक कार्यकर्ते आणि दौलतचे संचालक व घटप्रभा शिक्षण प्रसारक मंडळ आमरोळीचे उपाध्यक्ष आणि अडकूर भागातील एक प्रगतशिल शेतकरी उत्तम धोंडीबा पाटील यांची जेष्ठ कन्या असून श्री.रामलिंग हायस्कूल व ज्युनि. कॉलेजचे प्राचार्य आर. डी. पाटील यांची ती पुतणी आहे. स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्राचार्य आर.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय शिक्षण घेतांना स्पर्धा परीक्षेचा पाया तिने रचला. तर MPSC मधून घवघवीत यश मिळविणारी ती गावातील नव्हे तर पंचक्रोशीतील पहिलीच मुलगी आहे.