गुटख्याची अवैध वाहतूक : २ टेम्पो पकडले

Loading

३२ लाख ७४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त : जिल्हा गुन्हे अन्वेषणची कारवाई

कुरुंदवाड : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेने शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे मोठी केली. कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात गुटख्याची अवैध वाहतूक करणारे २ टेम्पो पकडले. या कारवाईत पोलिसांनी २६ लाख ६४ हजार २०० रुपये किमतीचा गुटखा, दोन टेम्पो आणि इतर साहित्य असा एकूण ३२ लाख ७४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी संशयित आरोपी सचिन बाबन कोळी (वय २३, रा. रुई, ता. हातकणंगले) आणि महेश शिवाजी कोरवी (वय २८, रा. रुई, ता. हातकणंगले) या दोघांना अटक केली. कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारी मध्यरात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळावी कि, २ टेम्पोमधून कर्नाटक राज्यातील कागवाड येथून गणेशवाडीमार्गे गुटख्याची वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने तात्काळ औरवाड येथील गणेशवाडी रस्त्यावर सापळा रचला. पोलिसांनी संशयित टेम्पो क्र (एम. एच. 51.सी. 0981) आणि टेम्पो क्र. (एम. एच. 51.सी. 0811) अडवला आणि तपासणी केली. तर तपासणीमध्ये या दोन्ही टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात सुगंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ मिळून आले.

जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलिस अंमलदार ज्ञानू कुंभार, सागर माने, विशाल चोळगे, सागर कांबळे, महेश खोबरे आणि महेश खोत यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *