![]()
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान संपन्न
हुपरी /राजेंद्र पुजारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकल मराठा समाज रांगोळी यांच्या वतीने व्याख्याते वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले. आई बाप समजून घेताना या विषयी व्याख्यान हंकारे यांनी दिले. आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीमुळे धावपळीच्या युगात तरुण पिढीला आई वडिलांचा विसर पडत चालला असून या परस्थितीमध्ये आई वडिलांविषयी सकारात्मक विचार करून कुटुंबा मध्ये प्रेम संवाद वाढवणे काळाची गरज आहे असे ज्वलंत विचार प्रखडपणे आपल्या व्याख्यानातून हंकारे यांनी मांडले. आई वडिलांचे नाव उंचवायचे असेल तर परिवर्तन करायला च हवे आणि आईवडिलांच्या खांद्याला खांदा लावून येणाऱ्या परिस्तिथीशी लढून जगायला शिका असे ते म्हणाले. ज्याच्या घरात आई वडील आनंदी ते कुटुंब आनंदी असे प्रतिपादन प्रबोधन हंकारे यांनी केले.
प्रारंभी रांगोळी प्रदर्शन के उद्घाटन उद्योगपती प्रदीपराव देसाई यांच्या हस्ते झाले. सोसायटीचे अध्यक्ष दादासो पाटील, उपाध्यक्ष बंडोपंत सादळे, लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे, उप सरपंच शिवाजी सूर्यवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. यावेळी शाहीर प्रदीप सुतार यांचा पोवाड्याचा कार्यक्रमाने वातावरण शिवमय झाले होते.

