आमदार शिवाजीराव पाटील यांनी घेतलीचंदगड तालुक्यातील अधिकाऱ्यांची झाडाझडती

Loading

चंदगड : तातोबा गावडा

विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती आमदारांनी घेतली. सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत झाली पाहिजेत असे सुनावले. पोलीस स्टेशनला भेट दिली. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याशी चर्चा केली. जनतेला न्याय मिळावा यासाठी पोलीस यंत्रणा तत्पर असली पाहिजे, आणि इथून पुढच्या काळात पोलीस स्टेशन बाबत कोणती तक्रार माझ्यापर्यंत येऊ नये याची काळजी घ्यावी असे ठणकावून सांगितले. आजच्या या भेटीमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आमदारांच्या विषयी एक वेगळी धास्ती निर्माण झाली.

चंदगड तहसीलदार कार्यालयास त्यांनी भेट दिली. तहसीलदार राजेश चव्हाण यांना जनतेच्या कामाबाबत अनेक प्रश्न विचारले. कामांमधील दिरंगाई करीत नागरिकांची काम ताबडतोब करण्याच्या सूचना केल्या. तर भूमिलेख कार्यालयातील अधीक्षक महेश कुंभार यांना शेतकरी मोजणीसाठी पैसे भरतात परंतु पैसे भरून देखील वेळेत मोजणी होत नसल्याबाबत सुनावले.

यावेळी माजी सभापती शांताराम पाटील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे संयोजक नामदेव पाटील , संतोष तेली,अविनाश दुध्यापगोळ,तहसिलदार गडहिंग्लज ऋषिकेश शेळके, क्रिडा अधिकारी सिमा पाटील, अनिल पाटील, गटशिक्षणाधिकारी अधिकारी हल्बागोळ, गटविकास अधिकारी भोगे अनिल शिवनगेकर ,रवींद्र बांदिवडेकर भाजप तालुका अध्यक्ष दिग्विजय देसाई, विशाल बल्लाळ, विद्या पाटील ,अशोक गडदे ,आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *