![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी –

चिपरी तालुका शिरोळ येथे २२ वर्षाच्या तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला असून ही घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. संदेश लक्ष्मण शेळके, राहणार माळ भाग अहिल्यानगर चिपरी असे तरुणाचे नाव आहे. आज्ञात हल्लेखोरानी धारदार शस्त्राने संदेश शेळके याच्या मानेवर तसेच अंगावर वर्मी ६ घाव घातले. या घावांमुळे संदेशचा जागेवरच मृत्यू झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यातील मयत संदेश शेळके हा आपल्या जवळील ओला मोटारसायकल वरुन सकाळी साडेआठच्या सुमारास तारांगण हॉटेल समोरील बस स्टॉपवर बहीणीला सोडून परत घरी जात होता. मधेच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरानी अचानक हल्ला केला. त्यासाठी हल्लेखोरांनी संदेश याचा पाठलाग केला. भांबवलेल्या अवस्थेत संदेश याने त्याच्याकडील मोटार सायकल घोडावत यांच्या पार्किंग संरक्षण भिंती लगत असलेल्या राजू सूर्यवंशी यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील गट नंबर ४३४ जवळ गेला असता पाठलाग करणाऱ्या आज्ञात हल्लेखोरानी घावांमुळे संदेशचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवला. यावेळी जयसिंगपूर पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळुंके यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास यंत्रणा गतिमान करून संशयित आरोपींंचा शोध घेण्यासाठी जयसिंगपूर पोलिसांना आदेश दिले.