डॉ.अतिश नेमगोंडा पाटील यांच्या संशोधनास युनायटेड किंगडम (U.K.) सरकारचे पेटंट

Loading

इचलकरंजी : प्रतिनिधी

येथील डी.के.ए.एस.सी. कॉलेज मधील भूगोलशास्त्र विभागातील डॉ. अतिश नेमगोंडा पाटील यांच्या संशोधनाची अंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांच्या “सरफेस माऊंटेड वॉटर हायड्रोड्रिफ्ट फिल्टरेशन डिवाइस” या अभिनव संकल्पनेला युनायटेड किंगडम (U.K.) सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. ही नोंदणी बौद्धिक संपदा कार्यालय, यु.के. मार्फत, दिनांक ४ ऑगस्ट, २०२५ रोजी अधिकृतपणे जाहीर झाली. डॉ.पाटील यांना मिळालेले पेटंट महाविद्यालयातील मानव्यशास्त्र शाखेतून पहिलेच आहे.
पूर्ण जगभरात तसेच स्थानिक कोल्हापूर आणि इचलकरंजी मध्ये जल प्रदूषण ही गंभीर व संवेदनशील समस्या निर्माण झालेली आहे. त्यावर संशोधन ही काळाची गरज आहे, याच संदर्भाने डॉ. अतिश पाटील यांनी पाणी शुद्धीकरणावर संशोधन करत यश प्राप्त केले. सदरचा फिल्टर हा सांडपाण्यापासून वापरा योग्य पाणी बनव ण्यास सक्षम आहे.
या संशोधनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, सी.इ.ओ. कौस्तुभ गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डी.के.ए.एस.सी. कॉलेज चे प्राचार्य डॉ.एस.के.खाडे यांचे प्रोत्साहन तसेच महाविद्यालयातील डॉ.विनायक गानबावले, डॉ.सुनिल भोसले, डॉ.अजिंक्य पत्रावळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *