![]()
आजरा : प्रतिनिधी

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये संस्कार शिबिर संपन्न झाले. या उपक्रमांतर्गत इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व संस्कृत या विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी येथील इंग्रजी विषयाच्या अध्यापिका भाग्यश्री प्रवीण चिकोर्डे यांनी हे मार्गदर्शन केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील इचलकरंजी येथील शाखेत भाग्यश्री चिकुर्डे यांनी जवळ जवळ 22 वर्ष इंग्रजी व 100 गुणांचे संस्कृत हे दोन्ही विषय प्रभावीपणे शिकवत नेहमी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. त्यांच्या अध्यापनाचे कौशल्य व संस्कृतमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी त्यांनी राबवलेले विविध उपक्रम त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांच्या या संस्कार शिबिर अंतर्गत व्याख्यानमालेत सांगितले. त्याचबरोबर दोन्ही विषयाच्या प्रश्नपत्रिका दिलेल्या वेळेत कशा सोडवायच्या याबद्दलही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी आजरा महाल शिक्षण मंडळ सचिव अभिषेक शिंपी, संचालक सचिन शिंपी, सुधीर जाधव ,प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार व प्रशालेतील इंग्रजी व संस्कृतचे सर्व अध्यापक उपस्थित होते. पी.व्ही. पाटील यांनी प्रस्ताविक करून सूत्रसंचालन केले. तर परिचय व्ही.एच. गवारी यांनी करून दिला. आभार सौ. एस.डी.इलगे यांनी मानले.
