संजय गांधी निराधार योजनेतील पात्र लाभार्थी 8 महिन्यांपासून अनुदानापासून वंचित 

Loading

डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक त्रुटी  

इचलकरंजी/प्रतिनिधी –
संजय गांधी निराधार याेजनेतील पात्र लाभार्थी डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक त्रुटीमुळे 8 महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. या संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढून या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तातडीने खात्यावर जमा करावे यासह विविध अडचणीबाबत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी भेट घेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. 
जिल्हाधिकारी येडगे यांनी डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिकत्रुटीबाबत आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. त्याचबराेबरस्वस्त धान्य दुकानातील धान्यासाठी प्राप्त अर्जांची लवकर निर्गत हाेण्यासाठी इचलकरंजी पुरवठा कार्यालयात तातडीने दुसऱ्या लाॅग इनची साेय करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी संबंधितांना दिले.

इचलकरंजी शहरात स्वस्त धान्य दुकानाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षणीय असूनमाेठ्या प्रमाणात प्राप्त हाेणाऱ्या अर्जांची अंमलबजावणी करण्यास इचलकरंजी पुरवठा कार्यालातमनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे कामे पूर्ण हाेण्यास विलंब हाेत असलेने लाभार्थ्यांच्यातक्रारी वाढत आहेत. त्याबराेबर संजय गांधी निराधार याेजनेतील जवळपास 5 हजार लाभार्थ्यांचेअनुदान थकीत असून डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना लाभ मिळण्यास विलंबहाेत असल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारीयेडगे यांनी भेट घेतली. ८ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या लाभार्थ्यांची आर्थिककुचंबणा हाेत आहे. डी.बी.टी. द्वारे थेट खात्यावर अनुदान मिळण्यासाठी जी नाेंदणी करावीलागते, त्यासाठी नाेंदणी करताना एक ओ.टी.पी. येताे. परंतु, मागील 2 महिन्यांपासून हीनाेंदणीची लिंक बंद असलेने पात्र असुनही नाेंदणी करता येत नसलेने अनेक लाभार्थी लाभापासूनवंचित राहत आहेत. या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान मिळावे, डी.बी.टी. नाेंदणी झाल्यानंतरएकाच महिन्याचे अनुदान जमा हाेत असून उर्वरित न मिळालेले अनुदान फरकासहित मिळावे, मागील तीन मिटिंगमध्ये मंजूर असलेले सुमारे 4,500 लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या तारखेपासूनफरकासहित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हावे, तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ याेजनेतील लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) ऑनलाईन करतेवेळी नाॅट रजिस्टर्ड असा मेसेज येत आहे. परंतु, हे सर्व पूर्वीचे लाभार्थी रजिस्टर्ड आहेत त्यामुळे त्याबद्दलचीत्रुटी दूर करावी आदी मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी या संदर्भातआपण शासन दरबारी पाठपुरावा करु असे सांगितले.

यावेळी माजी मंत्री आवाडे यांनी, सध्या इचलकरंजी पुरवठा कार्यालयात एकाच लाॅग इन वर काम चालू असलेनेत्यामध्ये विलंब हाेत आहे. प्रलंबीत असलेल्या शिधापत्रिकेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी व नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी पुरवठा कार्यालयात आणखीनएक लाॅग इनची साेय करुन देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीनेदुसèया लाॅग इनची साेय करुन देण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.
त्याचबराेबर निराधारांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने संजयगांधी निराधार अनुदान याेजना अंतर्गत निराधार गरीब व गरजू लाभार्थ्यांना दरमहा अनुदानदिले जाते. त्या अंतर्गत संजय गांधी, श्रावणबाळ वृध्दापकाळ, इंदिरा गांधी विधवा, इंदिरागांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ याेजनेतील पात्र 5 हजार लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासूनडी.बी.टी. द्वारे अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा केली जात आहे. परंतु, काही तांत्रिकत्रुटींमुळे मागील 8 महिन्यांपासून इचलकरंजी संजय गांधी याेजना कार्यालयातील लाभार्थ्यांनाअनुदान मिळालेले नाही. तसेच राष्ट्रीय कुटूंब लाभ याेजना लाभार्थ्यांना देखील अलीकडीलकाळात लाभ मिळालेला नाही. या शिष्टमंडळात प्रकाश दत्तवाडे, श्रीरंग खवरे, शशिकांत माेहिते, संजय केंगार, अनिल डाळ्या, शेखर शहा, रवी जावळे, राहुल घाट, काेंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, रमेश पाटील,रामा पाटील, नजमा शेख, मंगल सुर्वे, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते आदींचा समावेश हाेता.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *