![]()
टोल बंद करावा : न्यू आजरा रोडलाईन्सची मागणी

आजरा : प्रतिनिधी
संकेश्वर -बांदा महामार्ग आजरा वासियांना सोयीचे कमी आणि डोकेदुखी मात्र जास्त असल्याचेजाणवत आहे. विविध पक्ष, संघटना एकत्र येत येथील टोलनाक्याला विरोध केला आहे. त्याचप्रमाणेआजरा येथे मोटर मालक व चालक यांची न्यू आजरा रोडलाईन्स सहकारी वाहतूक संस्था कार्यरतअसून या संस्थेने आपल्या ट्रक मालक चालकांच्या अडचणी, सद्याची ट्रक वाल्यांची व्यवसायाचीपरिस्थिती,वाढते डिझेल दर, प्रत्येक गोष्टीला आकारले जाणारे कर, वाहन पासिंगसाठी असलेलेनियम व दंड, वाहन दुरुस्ती देखभालीचा खर्च या सर्वांचा मेळ घालताना तारेवरची कसरत करावीलागते. अशातच पुन्हा आता एम. आय. डी. सी. जवळ परत टोल टॅक्स सुरु करण्याचे नियोजन सुरुआहे. याला विरोध करीत हा टोल बंद करावा अशी मागणी न्यू आजरा रोडलाईन्स संस्थेने केलीअसून याबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.
ट्रक व्यावसायिक अनेक अडचणीत आहेत.सर्व प्रकारचे कर अगोदरच लावले आहेत. रस्त्यावरील सर्व कर लागू आहेत. डिझेलचे दर गगनालाभिडले आहेत. ट्रक दुरुस्ती सुद्धा दर वाढले आहेत. परंतु भाडेदरामध्ये मात्र काहीहीबदल झालेला नाही. ट्रक व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आहे. ट्रकमालक सरकारला रोड टॅक्स, इन्शुरन्सटॅक्स, पर्यावरण टॅक्स, व्यवसाय कर, प्रदूषण कर आशा अनेकविध प्रकारचे कर देतो. आशापरिस्थितीत सरकारचे नवनवीन टोलनाके वाढतच जात आहेत. या टोलमुळे खर्चात अधिकच भर पडतआहे.त्यामुळे ट्रक व्यवसाय अडचणीत येत आहे. सरकारने ट्रकवाल्याना कोणत्याच सेवा सुविधाआजपर्यँत दिलेल्या नाहीत. रस्त्यावरचा इतर त्रास तर न बोलण्यापलीकडचा आहे. या सर्वबाबींचा विचार करून आजऱ्यामध्ये एम. आय. डी. सी. जवळील नियोजित असणारे टोल टॅक्स बंदकरावे असे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर सुलेमान नसरदी, नियाज तकीलदार, युसूफ भडगावकर, इसाक नेसरीकर, इस्माईल यांच्या सह्या आहेत.
