रोटरी क्लब ट्रेड सिटीचा पदग्रहण सोहळा शानदार

Loading

अध्यक्ष डॉ. अतिक पटेल यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारला

जयसिंगपूर : प्रतिनिधी –

रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या सन २०२५-२६ साठीचे नवे अध्यक्ष डॉ. अतिक पटेल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात हा शानदार सोहळा संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रपती पदक विजेते हाजी महंमदशफी पटेल गुरुजी यांनी जयसिंगपूर बस स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध मुबलक पाणी मिळावे या उद्देशाने आर ओ प्लांट बसवुन दिला आणि या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासली. तर महेंद्रकुमार पोरवाल यांची सेक्रेटरी पदी तसेच खजिनदारपदी एडवोकेट उदय कुलकर्णी यांना पीडीजी रोटे. हरीश मोटवानी यांच्या हस्ते पदभार स्वीकारण्यात देण्यात आला. रोटरी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मिरर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी पीडीजी हरीश मोटवानी यांनी “रोटरी मुळे लोकांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाले, जगातून पोलिओ नष्ट करण्यामध्ये रोटरीचा मोठा हातभार आहे, रोटरी ट्रेड सिटीचे कार्य अतिउत्तम आहे, भविष्यातही रोटरीचे नाव अधिकच प्रभावशाली राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर नूतन प्रेसिडेंट डॉ. अतिक पटेल यांनी ” आई-वडिलांच्या प्रेरणेतूनच सामाजिक बांधिलकीची आवड निर्माण झाली असून त्यांच्या आशीर्वादामुळेच ते आज धन्वंतरी क्षेत्राबरोबरच रोटरी क्लब ट्रेड सिटीच्या या पदावर विराजमान झाले आणि या माध्यमातून पुढील काळामध्ये यापेक्षाही अधिक जोमाने सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत राहीन”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दीप प्रज्वलनाने व राष्ट्रगीताने सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे झालेल्या शानदार पदग्रहण सोहळ्यामध्ये डॉ. अतिक पटेल यांना सन 2025 26 सालाकरिता प्रेसिडेंट

यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटे दादासो चौगुले असिस्टंट गव्हर्नर रोटे गिरीश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आम. डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी जि. प. सदस्य अनिल उर्फ सावकर मादनाईक, माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे, माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले, राजू झेले, राकेश पारीख, बजरंग खामकर, संतोष खामकर, राजगोंडा पाटील, मिलिंद भिड़े, शिवराज पाटील, नारायणदास बलदवा, गंगाबिषण बजाज, राजकुमार बलदवा, मल्लिकार्जुन बड्डे, प्रदीप पाटील, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. तृप्ती खामकर, वसुंधरा कोले, अर्चना विभूते आदींसह शहर व परिसरातील व्यापारी, डॉक्टर्स , इंजिनीअर्स, रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गायकवाड व अर्चना विभुते यांनी केले तर आभार नूतन सेक्रेटरी महेंद्र पोरवाल यांनी मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *