![]()
जीवन गौरव पुरस्कार सुरेश बहिरशेट यांना


सांगली : प्रतिनिधी
दक्षिण भारत जैन सभेचे त्रैवार्षिक महाधिवेशन रविवार (ता.२०) व सोमवार (ता.२१) रोजी हारूगेरी (ता. रायबाग, जि.बेळगावी) येथील श्री आदिनाथ समुदाय भवन येथे होत आहे. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे भूषविणार असून या त्रैवार्षिक अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष युवा नेते उत्तम रावसाहेब पाटील हे आहेत.
सोमवार (ता.२१) रोजी सभेच्यावतीने देण्यात येणारा डॉ. कर्मवीर भा. पाटील शिक्षण सेवा पुरस्कार जनता एज्युकेशन सोसायटीचे भिमगोंडा व. कर्नवाडी यांना आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तसेच श्रावकरत्न रावसाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार मुंबई येथील नामवंत उद्योगपती सुरेश भूपाल बहिरशेट यांना आमदार अभय पाटील यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यावेळी पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी समाजसेवा पुरस्कार विजय बाबूराव कोगनोळे (कवठे एकंद) यांना आमदार राहूल आवाडे यांच्या तर श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द सह.आदर्श संस्था पुरस्कार महावीर मल्टिपर्पज क्रेडिट सौहालर्द सह. लि. संस्थेला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यांच्यासह विविध क्षेत्रातील २३ मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व बेळगावचे पालकमंत्री नामदार सतिश जारकीहोळी व कर्नाटक राज्याचे नियोजन व सांख्यिकी मंत्री नामदार डी. सुधाकर हे प्रमुख अतिथी, माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार महेंद्र तमण्णावर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अभय पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह खासदार कु. प्रियांका जारकीहोळी, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार राजू कागे, आमदार सौ. शशिकला जोल्ले, आमदार राहूल आवाडे, आमदार दुर्योधन ऐहोळे, आमदार गणेश हुक्केरी, आमदार निखिल कत्ती, आमदार लखन जारकीहोळी, आमदार चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी आमदार शाम घाटगे, पी.राजू, महंतेश कवटगीमठ, महेश कुमठोळी, संजय पाटील, विवेकराव पाटील, कल्लाप्पा मगेण्णावर, मोहन शहा, सुभाष जोशी यांच्यासह कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील विविध आर्थिक व सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
