वीर शिवा काशीद यांना अभिवादन आणि वंदन

वीर शिवा काशीद यांना अभिवादन आणि वंदन

Loading

नाभिक समाजाच्या वतीने आयोजन

आजरा / हसन तकीलदार

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर गावात जन्मलेले व हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसणारे आणि सिद्धी जौहरच्या वेढ्यातून शिवाजी महाराजांना बाहेर काढण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शिवा काशीद यांची श्रद्धापूर्ण पुण्यतिथी साजरी झाली. येथील नाभिक समाजाच्या वतीने युवा नेते अनिकेत चराटी व विलास नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री संतसेना महाराज नाभिक पत संस्था येथे ही अभिवादन आणि वंदन सभा संपन्न झाली. यावेळी विलास नाईक यांनी वीर शिवा काशीद यांचा इतिहास मांडताना म्हणाले की, वीर शिवा काशीद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागून समाधी उभारली आहे. इतिहास शिवा काशीद यांचे धाडस, बलिदान कदापिही विसरू शकणार नाही. कारण शिवा काशीद यांच्यासारख्या मावळ्यांच्या बलिदानाने स्वराज्याचे देखणे छत्रपती शिवराय साकारू शकले. अशी आदरांजली त्यांना वाहिली.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत नाभिक समाजाचे युवा कार्यकर्ते हृषीकेश भोसले व युवा कार्यकर्त्यांनी श्रीराम रुग्णवाहीकेची सेवा सुरु केली आहे. या रुग्णवाहिकेचे उदघाट्नही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर बोलताना म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम खरोखरच अनोखा आहे. सामाजिक बांधिलकी जपत रुग्णवाहीकेची सेवा सुरु केलेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. युवा नेते अनिकेत चराटी यांनी संत सेना महाराज पत संस्थेच्या वाढीसाठी व नाभिक समाजाच्या युवकांना मार्गदर्शन केले. तर आकाश शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, युनोस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये शिवरायांचे 12किल्ले संवर्धनासाठी घेण्याचा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम अभिनंदनीय आहे. याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. आणि त्यात पन्हाळगडाला प्राथमिकता देण्यात आली आहे ही बाब अभिमानास्पद आहे. याच पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांचा इतिहास आजरामर आहे.

प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. वीर शिवा काशीद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नाभिक संघटनेचे अध्यक्ष गौतम भोसले यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब पाचवडेकर, रामचंद्र शिंदे, अशोक पाचवडेकर, आनंदा इंगळे, दत्ता पोवार, रामा पाचवडेकर, संजय पाचवडेकर, संजय यादव, प्रकाश यादव, देव पाचवडेकर यांच्यासह आजरा तालुक्यातील नाभिक समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *