आजरा प्रशालेचे घवघवीत यश : एमटीएस परीक्षेत इयत्ता ९ वीचे तब्बल 22 विद्यार्थ्यां चमकले

आजरा प्रशालेचे घवघवीत यश : एमटीएस परीक्षेत इयत्ता ९ वीचे तब्बल 22 विद्यार्थ्यां चमकले

Loading

आजरा : प्रतिनिधी

नौरोसजी वाडिया कॉलेज,पुणे यांचे मार्फत एप्रिल 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एमटीएस परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा प्रशालेतील इयत्ता नववीच्या तब्बल 22 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जिल्हा,तालुका,विशेष प्राविण्य व प्रशस्तीपत्रधारक विद्यार्थी अशा सर्वच गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी स्थान पटकाविले असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे संचालक  सचिन शिंपी, कृष्णा पटेकर ,प्राचार्य एम एम नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे.शेलार यांचे हस्ते सत्कार व अभिनंदन करून गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थिनी पुढीलप्रमाणे आहेत. 
1.पाटील प्रणव भगवान 146 गुण (जिल्ह्यात तिसरा ), 2.शेख जुवेरिया समीर 135 गुण (स्पेशल प्राईझ), 3.पाटील वेदिका शांताराम 129 गुण (तालुकास्तरीय प्रथम) तर प्रमाणपत्रधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत. येसणे प्रेम रमेश 123 गुण, आजगेकर माधवी जीवन 121 गुण, मोटे ईशान सुरजीत 120 गुण, नाईक सृष्टी सजीव 118 गुण, हरेर अनुष्का अजित 118 गुण, तावडे सिद्धी दशरथ 117 गुण, कार्तिक सुरेश हुबळे116 गुण, गिरी शलाका ओमकार 115 गुण, देशमुख रिया अरविंद 114 गुण, माने मधुरा महेश 113गुण, भोसले अंशुमन हिम्मत 110 गुण, कुंभार यशराज संतोष 106गुण, सावंत अवधूत अमित 105 गुण, पोटे मानसी अनिल 104 गुण, अस्वले अनुष्का शरद 98 गुण, सुतार आर्या दीपक 98 गुण, सुतार दर्शना दिलीप 93 गुण, माड भगत मैथिली वसंत 88 गुण, खरोडे आदित्य कृष्णा  71गुण. गुणवंतांना पी.एस.गुरव,सौ.ए.डी.पाटील, एस.वाय.भोये,  श्रीमती एस.टी.पाटील, (विभागप्रमुख) यांचे मार्गदर्शन आणि प्राचार्य एम.एम.नागुर्डेकर, माजी प्राचार्य आर.जी.कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार, अध्यक्ष जयवंतराव शिंपी,उपाध्यक्ष,खजिनदार, सचिव व संचालक आजरा महाल शिक्षण मंडळ,आजरा यांचे प्रोत्साहन लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *