हनुमान सहकारी दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध अध्यक्षपदी तानाजी वाईंगडे : पांडुरंग बेरडे उपाध्यक्ष

Loading

अडकुर : प्रतिनिधी –
आसगोळी येथील हनुमान सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी मारुती वाईंगडे व उपाध्यक्षपदी पांडुरंग दत्तू बेरडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी काम पाहिले. तर रामचंद्र बापू दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत या निवडी झाल्या.

अन्य संचालक मंडळ असे सुरेश कडुकर, अमर गुरव, नामदेव नार्वेकर, शिवाजी बेरडे, धोंडिबा देसाई, रामू कांबळे उपस्थित होते. तर सेक्रेटरी शंकर अर्जुन वाईंगडे स्वागत करून आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *