रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : शिवसेना शिंदे गट व श्रीकांत फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

Loading

आजरा हसन : हसन तकीलदार

शिवसेना (शिंदे गट) व डॉ. श्रीकांत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 8 जून रोजी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 73 जणांनी रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावून पुण्य कमावले. रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे नियोजन सौ. धनश्री देसाई (महिला जिल्हाप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष ) यांनी केले.

शिबिराचे उदघाटन प्रशांत साळुंखे (संपर्क प्रमुख पश्चिम महाराष्ट्र शिवसेना वैद्यकीय कक्ष )यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रेही प्रदान करण्यात आली.

डॉ. सुरजीत सुधाकर पांडव यांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, आजरा तालुका प्रमुख पदी मंगेश चिवटे (शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख ) यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. आणि उमा संकपाळ यांची महिला तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

आजरा भागातील रक्तदात्यांनी अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जवळ जवळ 73 जणांनी रक्तदाते म्हणून सहभाग नोंदवला आणि रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यास विनायक जरांडे (जिल्हा प्रमुख ), निलेश पाटील (उपजिल्हाप्रमुख ), मानसिंग देसाई, सतीश पवार, हर्षवर्धन देसाई तसेच शिवसेना कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *