सायबर गुन्हेगारीचा कहर : तिघांचा मोबाईल नंबर हॅक  केला

Loading

६ लाख रुपयांची फसवणूक

चंदगड : प्रतिनिधी-

 सायबर गुन्हेगारांनी व्हाट्सअप ग्रुपवर एक लिंक पाठवली. पांडुरंग महादेव पाटील यांनी ती लिंक ओपन करताच हॅकर्सनी सर्वप्रथम त्यांचे व्हाट्सअप हॅक केले. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप नंबरचा पूर्ण ताबा मिळवला व त्यांच्या हॅक झालेल्या नंबर वरून गावातील ग्रुपवर तीच लिंक शेअर केली. मित्राने पाठवलेले लिंक ग्रुप वर आली आहे असे समजून दीपक आणि विश्वनाथ यांनी ती लिंक ओपन केली. पण त्यामागे हॅकर्सचा हात होता कारण हॅकर्सनी लढविलेली ही नवीन शक्कल होती. मात्र त्यांच्या लक्षात आले नाही. त्यानंतर या सर्वांच्या खात्यातून अनुक्रमे एक लाख तीन हजार, दोन लाख व तीन लाख असे एकूण सहा लाख तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातून गायब करण्यात आली. खात्यातून पैसे कपात झालेला मेसेज पाहून त्यांनी थेट बैंक गाठली आणि आपले खातं लॉक केले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. याची तक्रार कोवाड पोलीस स्टेशन (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे ऑनलाईन नोंदविण्यात आली आहे प्राथमिक चौकशी सुरू केली असून हे प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान नागरिकांना कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच ओटीपी, पासवर्ड, बैंक डिटेल्स कुणालाही शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारीने कहर माजवला असून चंदगड तालुक्यातील एका गावातील तिघांचा मोबाईल नंबर हॅक करून त्यांची सुमारे ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शिनोळी (ता. चंदगड) येथील एका कंपनीमध्ये काम करत असलेल्या निटूर या गावातील तीन कर्मचाऱ्यांचा दि. २१ मे रोजी मोबाईल नंतर हॅक केला. बैंक खाती हॅक करून सुमारे ६ लाख ३ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २० ते २२ मे दरम्यान घडली असून २२ मे रोजी कोवाड पोलीस स्थानकात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आली आहे. विश्वनाथ पाटील तीन लाख रुपये, पांडुरंग महादेव पाटील दोन लाख रुपये आणि दीपक कृष्णा पाटील एक लाख तीन हजार रुपये (सर्वजण रा. निट्टूर) अशी फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नावे आहेत. त्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र, कोवाड शाखा येथे असून याच शाखेतून ही रक्कम चोरांनी उचलली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *