त्या रस्त्याच्या देयकाबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणार :उप अभियंता देसाई यांचा खुलासा

Loading

मौजे तिरमाळ तालुका चंदगड येथील ग्रामीण मार्ग 85 कामाबाबत तफावत नसल्याचा दावा

चंदगड / प्रतिनिधी
मौजे तिरमाळ राजगोई बुद्रुक पैकी ग्रामीण मार्ग 85 कामाबाबत अन्वेषण लाईव्ह 24 मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेत सदर कामाची ग्रामस्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अहवालाचे अवलोकन उप अभियंता आणि शाखा अभियंता यांनी केले. कामाची गुणवत्ता, साहित्य चाचणी अहवाल वगैरे माहिती घेतली असता सदर कामाच्या दर्जाबाबत तफावत दिसून आली नाही असा दावा त्यांनी केला. तर सदरचे काम हे OGC व Premix Carpet केले असले बाबत प्रसिद्ध झालेनुसार त्याबाबत अधिकारी वर्गाशी चर्चा केली. तरी या कामाचे देयक वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शन नुसार केले जाईल अशी माहिती उप अभियंता आणि शाखा अभियंता यांनी दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *