शिवयोग फौडेशनच्या वतीने एअर बेड प्रदान

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

  येथील शिवयोग फौडेशनच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त कवडसा फौंडेशनला शिवपुत्र जीवन पाटील यांच्या मातोश्री कै.विमल जनार्दन पाटील यांचे स्मरणार्थ एअर बेड या वैद्यकीय साहित्याची देणगी देण्यात आली.    

शिवयोग फौंडेशन गेली अनेक वर्षे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राबवत आहे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,अपंग विद्यार्थीनींना सायकल वाटप, शालेय विद्यार्थीनीचे लेझीम पथक तसेच कलागुणांना वाव देण्यासाठी शिवस्पुती गिते,तालुका स्तरीय चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा इत्यादीचे आयोजन केले आहे.

यावर्षी कवडसा फौंडेशन ही संस्था वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहे.सामाजिक कार्यकर्ते डाॅ.महाविर आकोळे यांचे मार्गदर्शनाखाली बंडू उरूनकर संस्थेचा कारभार सांभाळत आहेत. या देणगीमुळे गरीब घरातील त्वचा रोगीना अल्पशा दरामध्ये एअर बेड उपलब्ध होणार आहे.या कार्यक्रमावेळी शिवयोग फौंडेशनचे सचिन किसन इंगवले देवदत्त चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते