![]()
१ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ
जयसिंगपूर : प्रतिनिधी
घोसरवाडकरांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला पाणीप्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार असून गावाला शुद्ध, मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून घोसरवाडमध्ये पेयजल योजनेसह सोलर सिस्टिम व आधुनिक फिल्टर हाऊसच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे गावाला पुरेसा पाणीपुरवठा होणार असून ग्रामपंचायतीच्या वीजबिलात मोठी बचत होणार आहे. घोसरवाड गावाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपण स्वीकारली असून आतापर्यंत अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही घोसरवाडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा निर्धार आमदार यड्रावकर यांनी व्यक्त केला.
घोसरवाड येथे १ कोटी २८ लाख रुपयांच्या निधीतून जलजीवन योजनेचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना यड्रावकर पुढे म्हणाले, घोसरवाड गांवच्या सर्वांनी विकासासाठी आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून गावचा चेहरा – मोहरा बदलत आहे. गावातील सर्वच प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. नागरिकांच्या येण्याचा पाण्याचा प्रश्न दिल्या अनेक वर्षापासून होता, पेजल योजनेच्या माध्यमातून सदरचे काम येत्या काळात पूर्ण होईल आणि लवकरच घोसरवाड गावातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार आहे. यापुढेही गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेन असे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी सरपंच साहेबराव साबळे, उपसरपंच रेश्मा बिरणगे, विजितसिंह शिंदे, मयूर खोत, बाबुराव पोवार, धनपाल जुगळे, बाळसिंग मिसाळ, अनिल अकिवाटे, प्रमोद कांबळे, राकेश कागले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

