![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि कुरुंदवाड नगरपरिषदेच्या नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील वीर विनायक दामोदर सावरकर भवन येथे भव्य कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा हा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्षा मनीषा डांगे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड शहरासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला असून दोन्ही शहराचा विकास होत आहे. यापुढेही राहिलेल्या कामांना व नवीन विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देऊन दोन्ही शहरांच्या विकासाची गती कायम ठेवण्यात येईल, असे सांगितले.


