![]()
सत्ता राजर्षी शाहू आघाडीकडे : शिरोळ तालुका विकास आघाडीला 5 जागा
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी आज रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सिध्देश्वर मंदिर यात्री निवास येथे दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा चव्हाण यांनी वैधरित्या निवडून आलेल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. यामध्ये राजर्षी शाहू आघाडीचे संजय पाटील यड्रावकर यांची नगराध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. तर विरोधी शिरोळ तालुका विकास आघाडीला 5 जागांवर समाधान मानावे लागले.
नगरपरिषदेसाठी एकूण १३ प्रभागांतील ‘अ’ व ‘ब’ अशा २६ जागांसाठी निवडणूक झाली होती. प्रभागनिहाय निवडून आलेले नगरसेवक पुढीलप्रमाणे—
प्रभाग १: ‘अ’ कोळी गिरमल परगोंडा, ‘ब’ तेजश्री राहुल पाटील (राजर्षी शाहू आघाडी ),प्रभाग २: ‘अ’ बंडगर रुपाली राहुल, ‘ब’ चौगुले सचिन महावीर, (राजर्षी शाहू आघाडी ) प्रभाग ३: ‘अ’ नांद्रेकर मीनल रोहित, ‘ब’ सचिन (बंडू) आप्पासाहेब निटवे ( राजर्षी शाहू आघाडी ), प्रभाग ४: ‘अ’ मछले शकुंतला कांतीलाल, ‘ब’ गोसावी लक्ष्मण शंकर (राजर्षी शाहू आघाडी),
प्रभाग ५: ‘अ’ कडबी सुमैय्या सुलेमान, ‘ब’ खामकर बजरंग मनोहर ( राजर्षी शाहू आघाडी ),प्रभाग ६: ‘अ’ कलकुटकी महेश प्रदीप , ‘ब’ मादनाईक स्वाती सागर ( राजर्षी शाहू आघाडी) ,प्रभाग ७: ‘अ’ कोळेकर अनिता अशोक, ‘ब’ जाधव संतोष बाबूराव (शिरोळ तालुका विकास आघाडी ) ,प्रभाग ८: ‘अ’ वाघवेकर उज्वला उत्तम, ‘ब’ पाटील पराग शामराव ( राजर्षी शाहू आघाडी)
प्रभाग ९: ‘अ’ मळगे अशोक मनोहर, ‘ब’ फरास कुलसुम फिरोज ( राजर्षी शाहू आघाडी) ,प्रभाग १०: ‘अ’ अर्जुन उर्फ राजीव तानाजी देशमुख, ‘ब’ आडके अनुराधा राजेंद्र ( राजर्षी शाहू आघाडी), प्रभाग ११: ‘अ’ भोसले गीता संजय ( राजर्षी शाहू आघाडी) , ‘ब’ पवार रंगराव हिंदुराव (शिरोळ तालुका विकास आघाडी ), प्रभाग १२: ‘अ’ आडगाणे अर्चना विद्यासागर ( राजर्षी शाहू आघाडी) , ‘ब’ संजयकुमार वसंत पाटील (कोथळीकर) ( राजर्षी शाहू आघाडी)) , प्रभाग १३: ‘अ’ गाडेकर लता दिलीप (अपक्ष ), ‘ब’ गुरव पंकज भरमाप्पा.( शिरोळ तालुका विकास आघाडी )
मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनीही भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण, पारंपारिक वाद्य फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.
