![]()
प्रथमवर्ष विद्यार्थी स्वागत व सत्रारंभ प्रसंगी प्रतिपादन

यड्राव : प्रतिनिधी
“आयुर्वेद ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक अमूल्य आणि महान देणगी आहे. शरद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ पदवीधारक न राहता, समाजात एक उत्तम ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखला जावा, असे शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे,” असे प्रतिपादन शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी केले.ते येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (बी.ए.एम.एस.) यांच्या प्रथमवर्ष सत्रारंभ व विद्यार्थी स्वागत समारंभात बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद कनप, उपप्राचार्य डॉ. अमित मासुले उपस्थित होते.श्री. बागणे पुढे म्हणाले की, “तांत्रिक, कृषी, फार्मसी, नर्सिंग, उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाच्या विविध क्षेत्रांतून ‘शरद पॅटर्न’ नावारूपाला आला आहे. त्याच धर्तीवर आयुर्वेद शिक्षणातही ही संस्था अग्रस्थानावर राहील. सुसज्ज रुग्णालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग, तसेच समृद्ध ग्रंथालय यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशभरातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्था कार्य करीत राहील.”कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी स्तवन व दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.प्राचार्य डॉ. प्रमोद कनप यांनी आयुर्वेदिक शिक्षणाचे शास्त्रीय, सामाजिक व व्यावहारिक महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपप्रचार्य डॉ. अमित मासुले यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांना वैद्यकिय शिक्षण, त्याचे समाजातील महत्व याविषयी माहिती दिली.या समारंभास संस्थेचे पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.नेहा बागवे यांनी केले. धन्वंतरी स्तवन डॉ. शिल्पा बहेती यांनी केले.आभार प्रदर्शन डॉ.चंद्रलेखा कलमाणी यांनी मानले.