शूरवीर तानाजी मंडळाचा राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर येथील शूरवीर तानाजी मंडळातील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात राजर्षी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा भव्य प्रवेश आघाडीसाठी महत्त्वाची ताकद ठरत असून, आघाडीच्या सर्वच उमेदवारांना विजय मिळवून देण्याचा एकमताने निर्धार यावेळी सर्व कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.
प्रवेश सोहळ्यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी नगराध्यक्ष आणि आघाडीचे नेते संजय पाटील यड्रावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन शूरवीर तानाजी मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत केले.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर नगरपालिकेची निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडी समाजभावनेतून, विकासाच्या दृष्टीकोनातून आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर लढवत आहे. गेल्या काही वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांवर जनतेचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे आघाडीतील प्रत्येक उमेदवार विजयी होणार, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.
ते पुढे म्हणाले की, विविध स्तरातून आघाडीला मिळत असलेला पाठिंबा हेच लोकांच्या मनातील समाधानाचे प्रतिक आहे. शूरवीर तानाजी मंडळाचा मिळालेला उत्स्फूर्त पाठिंबा आघाडीसाठी मोठे बळ आहे. या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेला विश्वास विकासाच्या दिशेने अधिक सक्षम पाऊल टाकणारा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सागर मादनाईक, प्रवीण देसाई, सचिन देशिंगे, गंगाराम माने, महेश भोसले, सतीश माने, महेश भोसले, सुधीर शिंगाडे, राहुल नलवडे, सचिन मिसाळ, संदीप भोसले, सुरेश नलवडे, दीपक शिंगाडे, आनंदा माने, मारुती पवार, परशुराम भोसले, विजय भोसले, संतोष भोसले, सतीश भोसले, जितेंद्र भोसले, राजू चौगुले, सतीश पवार राहुल भोसले, तम्मा भोसले, अविनाश शिंगाडे, पिंटू माने, सुनील हतळगे, रणजीत हतळगे, कुमार धोत्रे, कुमार हतळगे, अशोक गाडीवडर, जीवन मुदगल, सुरज मुदगल, आकाश घोराले, अमर मुदगल, संकेत माने, विजय सूर्यवंशी, भरत वडर, अमोल चौगुले, मोहन साळुंखे, संतोष वडर, राजू नलवडे, विनोद नलवडे, बापू पवार, पृथ्वीराज माने, ऋतुराज खुंठे, शुभम माने, किशोर पवार, सौरभ भोजने, सुरज पवार, विनोद पवार, अमोल नलवडे, नितीन कलाल, कृष्णा कलाल, करण चव्हाण, अर्जुन चव्हाण, रवी पवार, राजू शिंगाडे, गंगाराम शिंगाडे, अण्णासाहेब पाटील, प्रथमेश हातळगे, संदीप हातळगे, मोहन हातळगे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.