सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणार : उद्यानपंडित गणपतराव पाटील

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ, कुरूंदवाड, जयसिंगपूर नगरपालिका निवडणुका अत्यंत खंबीरपणे लढविणार असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांला न्याय या निवडणुकीत देणार असल्याचे यावेळी उद्यानपंडित गणपतराव पाटील म्हणाले. महाविकास आघाडी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब भिलवडे, वैभव उगळे यांचे मनोगत झाले. यावेळी सूर्यकांत पाटील, अशोक कोळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष दरगू गावडे, युनुस डांगे, उदय पाटील, संजय अनुसे, सचिन शिंदे, बंडू उमडाळे, आय आय पटेल, ऋषीराज शिंदे, संतोष जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष योगिता घुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मेघा गायकवाड, बाबासाहेब सावगावे, विशाल जाधव डि.पी.कदम, संदीप हवालदार, दयानंद मालवेकर, सचिन शिंदे, अनिल यादव, सुजाता शिंदे, अमरसिंह निकम, नितीन बागे, राजू आवळे, रावसाहेब दानोळे, सुर्यकांत पाटील बुध्दिहाळकर, शेखर पाटील, सर्जेराव पवार, स्वाती सासणे, बंडा मणियार, विश्वजीत कांबळे, चंद्रकांत पाटील घुणकिकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.