श्री गुरुदत्त शुगर्स एकरकमी विनाकपात ३४०० रूपये प्रतिटन दर देणार – चेअरमन माधवराव घाटगे

Loading

जयसिंगपूर : प्रतिनिधी

गुरुदत्त शुगर्स ने नेहमीच उच्चांकी ऊस दराची पंरपरा कायय राखली आहे.गळीत हंगाम सन २०२५ – २६ मध्ये कारखान्यास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०० रुपये विनाकपात देणार आहे. तसेच हंगाम समाप्तीनंतर केंद्र शासनाच्या एफ.आर.पी व आर. एस. एफ धोरणाप्रमाणे जो दर निघेल तो शेतकऱ्यांना देण्यास गुरुदत्त शुगर्स बांधिल असल्याचे कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी सांगितले.

पुढे बोलताना श्री. घाटगे म्हणाले श्री गुरुदत्त शुगर्स ने नेहमीच शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवून स्वच्छ व पारदर्शी कारभार केला आहे . कारखान्याने काटकसरीचे धोरण अवलंबून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात व शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात कारखाना त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा असून शेतकऱ्यांच्या पाठबळावर श्री गुरुदत्त शुगर्स ची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

पुढे बोलताना श्री. घाटगे म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी यांच्या पाठबळावर कारखान्याने आतापर्यंत २१ गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. शेतकरी आणि कारखाना ही साखर उद्योगाची दोन महत्वाची चाके असून ती व्यवस्थित चालली तरच साखर कारखानदारी टिकणार आहे. त्यामुळे गळीत हंगाम वेळेत सुरू होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला नोंद केलेला सर्व ऊस गळीतास कारखान्याला पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी श्री. घाटगे यांनी केले.

(सदर बातमीमध्ये चेअरमन माधवराव घाटगे साहेब यांचा फोटो वापरावा)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *