![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंगच्या चार विद्यार्थ्यांची इन्फोसिस या भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.सौरभ खानावळे यांनी दिली.महाविद्यालयातील ई. टी.सी.विभागाच्या कु. समीक्षा खराडे,प्रतीक्षा रामतीर्थकर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या कु. शितल फडके व ए. आय.डी.एस.विभागाच्या कु.श्रुती रजपुत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक 3.50 ते 6 लाख पर्यंत पॅकेजची ऑफर मिळालेली आहे.ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम,व्हाईस चेअरपर्सन डॉ.सोनाली मगदूम,कार्यकारी संचालक डॉ.सुनील आडमुठे , प्र.प्राचार्या डॉ.शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सर्व विभाग प्रमुख व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.