![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी-
जयसिंगपूर नगरपालिकेच्या प्रभाग 12 मधून शिवसेना ओबीसी महिला आघाडीच्या शिरोळ तालुका प्रमुख सौ.जुलेखा मुल्लाणी (दीदी ) लढणार अशी शक्यता सध्या व्यक्त केली जात असून प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.आत्तापर्यंत ग्राहक संरक्षण समिती,बचत गट व सामाजिक कार्यात गेले 10 वर्ष कार्यरत आहेत. महिलांचे वेगवेगळे प्रश्न सोडवणे,तसेच महिलांवरती अन्याय व आर्थिक पिळवणूक करणारे मायक्रोफायनान्स पासून मुक्ती मिळवण्यासाठी आंदोलने,महिलांबाबत अन्यायकारक घटना घडली.
किंवा एखादी तक्रार जरी आली तरी त्या तत्काळ दखल घेऊन न्याय देण्यासाठी अग्रस्थानी असतात, सौ.मुल्लाणी (दीदी )या कणखर आणि धाडशी स्वभावाच्या असल्यामुळे महिलांना त्यांचे आकर्षण वाटते. त्यांच्या सामाजिक कार्याची पोचपावती प्रभाग 12 मधील सुजान नागरिक देतील अशी त्यांना दाट खात्री आहे. आणि या जोरावरच त्या प्रभागावर आपला ठसा उमटविणार आहेत.
शिवसेना ओबीसी महिला तालुका प्रमुख या पदावर त्या सध्या कार्यरत असून जयसिंगपूर शहरात अनेक विकास कामे करण्याचा त्यांचा मानस आहे.
