![]()
शिरोळ : प्रतिनिधी


श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सभासदांसाठी अपघात विमा पॉलिसी घेतली जाते. कारखान्याच्या सभासद बंधूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व सभासदांचा अपघात विमा पॉलिसी घेतली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा सर्व अवयव निकामी झाल्यास किंवा कायमस्वरूपी दोन डोळे किंवा दोन हातपाय निकामी झाले तर एक लाख रुपये आणि एक डोळा किंवा एक हातपाय निकामी झाल्यास 50 हजार रुपये इतकी विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते. सदर विमा पॉलिसी न्यू इंडिया इन्शुरन्स लिमिटेड इचलकरंजी यांचेकडून धारण केलेली आहे. याच पॉलिसी अंतर्गत महापुरामध्ये अपघाती मयत झालेले 1) शौकत कादर देसाई अब्दुललाट यांचे वारस 2) बाबासो अण्णा चौगुले शिरदवाड यांचे वारस 3) सुधाकर बसगोंडा पाटील जुगुळ 4) महादेव रामा पाटील घोसरवाड यांचे वारस असे 4 सभासदाच्या वारसांना 4 लाख रुपये विमापॉलिसीचे चेक प्रदान करण्यात आला. आज अखेर मयत सभासदांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे 103 सभासदांच्या वारसांना एक कोटी तीन लाख लाख रुपये व हात पाय निकामी झालेल्या तीन सभासदांना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे असे एकूण 106 सभासदांना आत्तापर्यंत एक कोटी चार लाख 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली
सदरचा चेक प्रधान कार्यक्रमात गणपतराव पाटील दादा ,, चेअरमन रघुनाथ पाटील , अनिल राव यादव ज्येष्ठ संचालक , श्री इंद्रजीत पाटील , संचालक
विमा प्रतिनिधी ऋषिकेश पाटील , इतर मान्यवर संचालकांच्या उपस्थितीत चेक प्रदान करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील,उपस्थित होते. यावेळी संजय भोसले मॅनेजर फायनान्स,विमा सल्लागार एकनाथ अंबाजी पाटील, कोल्हापूरचे क्लेम मॅनेजर वसंत कोल्हे ,पुण्याचे रिजनल मॅनेजर प्रेमचंद मोरे, उप महाप्रबंधक एच बी अरुण कुमार डीजीएम पुणे प्रादेशिक कार्यालय, वरिष्ठ सहाय्यक रश्मी पिसाळ कोल्हापूर ,मृणाल उरुणकर ,, राधिका पाटील सहाय्यक,, ब्रँच मॅनेजर रोहन खाडीलकर ,शुभम कदम सहाय्यक असिस्टंट , नितीन पाटील सहाय्यक यांचे विशेष सहकार्य मिळाले.तसेच कारखान्याचे व शेअर विभागाचे परवेज मेस्त्री, इत्यादी उपस्थित होते.