![]()
आजरा : हसन तकीलदार

येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाण्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम सुरु होत असून बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम बुधवार दि. १५ ऑक्टोबर रोजी होत आहे. सकाळी ठीक ११ वा. कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई आणि संचालक मंडळ सदस्यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ होत आहे.
आजरा साखर कारखान्याच्या २७ व्या गळीत हंगामाची पूर्ण तयारी झाली असून कारखाना पूर्ण क्षमतेने चालवीण्याच्या दृष्टीने आवश्यक ती मशनरी ओव्हरहॉलव्हिंगची कामे पूर्ण केली आहेत. त्याचप्रमाणे ऊस तोडणी वाहतुकीकरिता कार्यक्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील 350 ऊस तोडणीमजूर टोळ्यांचे व वाहनांचे करार पूर्ण करून त्यांना ऍडव्हान्स रक्कमही आदा करण्यात आली आहे.
बॉयलर अग्निप्रदिपन दिवशी संचालक अनिल फडके व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता फडके यांचे हस्ते होमहवन विधी होणार असून यावेळी कारखान्याचे सभासद, शेतकरी कंत्राटदार, ठेवीदार व हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी केले आहे.