कोणतीही गोष्ट अशक्य नाही, जर तुम्ही ठरवली तर.. : सचिन पाटील

Loading

शरद इंजिनिअरिंगमध्ये फोल्क्स फेस्टचे उदघाटन : जर्मन भाषा शिकण्यासाठी स्पर्धा

यड्राव : प्रतिनिधी

कोणती ही गोष्ट अशक्य नाही, जर तुम्ही ठरवली तर.. जीवनात प्रत्येकाने आपले ध्येय ठरवायला हवे, तरच योग्य दिशा मिळेल. त्यामुळे जर्मन भाषा शिकायचं असेल तर ते मनापासून शिका. जागतिक कंपन्यामध्ये याचा खूप मोठा फायदा आहे. असे प्रतिपादन पुणे येथील टेक्ऩॉविंग्स अॅटोमेटेड इंडिया कंपनीचे डायरेक्टर सचिन पाटील यांनी केले. ते शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील फोल्क्स फेस्ट या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना मूलभूत गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्धे ज्ञान धोकादायक आहे. कोणत्याही क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करायला हवे. कॉलेजना विद्यार्थ्यांना संधी निर्माण करुन दिली आहे. ते कौशल्य आत्मसात करुन त्याचा आपल्या करिअरसाठी उपयोग करा. हे करीत असताना शिस्त हि खूप महत्वाची बाब असून ते नसेल तर तुम्ही शुन्य आहात.
यावेळी अनिल बागणे म्हणाले, कॉलेज विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतीरिक्त अनेक कौशल्य देत आहे. त्यातूनच आपले वेगळेपण अधोरेखीत होईल. या सर्वांतून तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. या इव्हेंटचे मॅनेजमेंट हे पण एक कौशल्य आहे. स्पर्धा आणि त्याचे नियोजन दोन्हीही तुम्हाला वेगळ्या उंचीवर नेतील.
यावेळी जर्मन भाषेत सादरीकरण, प्रश्नमंजूषा स्पर्धा, म्युझियम, फिल्म जेहन, हॅप्पी स्ट्रीट अशा विविध स्पर्धा झाल्या. त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी.बी. संगमे, सर्व डिन, विभाग प्रमुख, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थीत होते.
यावेळी स्वागत इव्हेंटचे समन्वयक प्रा. अंकिता माने यांनी केले. सूत्रसंचालन अदिती काळे व जेबा खाखु यांनी केले. आभार अखिल मुजावर, केदार कुलकर्णी यांनी मानले.

फोटो ओळ- यड्राव : येथील शरद इंजिनिअरिंगमध्ये फोल्क्स फेस्ट या इव्हेंटचे अदघाटन करताना सचिन पाटील, अनिल बागणे, डॉ. बी.बी. संगमे, अंकिता माने आदी.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *