साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल ४२०० रुपये करणे गरजेचे -चेअरमन माधवराव घाटगे

Loading

गुरुदत्त शुगर्स चा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न .

जयसिंगपूर : प्रतिनिधी

साखरेच्या दराभोवतीच साखर कारखान्याचे अर्थकारण फिरत असताना शासनाकडून साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होणे गरजेचे आहे. साखर उद्योगाला संकटातून कायमस्वरूपी आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने इथेनॉलची किमंतीमध्ये प्रतिलिटर ५ रुपये दरवाढ व साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल ४२००रुपये करावा अशी मागणी श्री गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी केले. कारखान्याचा २२ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी श्री.घाटगे बोलत होते.

पुढे बोलताना श्री घाटगे म्हणाले, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून श्री गुरुदत्त शुगर्स ने अनेक ऊसविकास व शेतकरीभिमुख योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. योजनेचा हजारो शेतकऱ्यांनी लाभ घेऊन एकरी उत्पादन वाढवले आहे.त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक सुख -दुःखात गुरुदत्त शुगर्स त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. गुरुदत्त शुगर्स व सामाजिक कार्य हे एक समीकरण तयार झाले आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये व शिरोळ तालुक्यामध्ये २००४,२०१९, २०२१ व २०२४ मध्ये आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना व जनावरांना आधार देण्याचे काम कारखान्याने केल आहे.बीड ,धाराशिव , लातूर जालना, परभणी व हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. श्री गुरुदत्त शुगर्स च्या वतीने मराठवाड्यातील सर्व पूरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याचे यावेळी श्री. घाटगे यांनी सांगितले. गाळप हंगाम २०२५-२६ साठी शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस गुरुदत्त शुगर्स ला गाळपासाठी पाठवावा असे आवाहन श्री घाटगे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,धीरज घाटगे, संचालिका साधना घाटगे ऐश्वर्या घाटगे, शिवाजीराव माने – देशमुख , बबनराव चौगुले, शिवाजी सांगले, धोंडीराम नागणे ,अण्णासाहेब पवार यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

फोटो लाईन –
श्री गुरुदत्त शुगर्स चा २२ वा बॉयलर अग्नीप्रदीपन करताना कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे,एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, धीरज घाटगे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *