![]()
सौ. रत्नाबाई मांगीलाल बजाज इंडस्ट्रियल पार्क यांच्या आर्थिक सहकार्याने गौरव सोहळा

जयसिंगपूर : प्रतिनिधी –
रोटरी क्लब जयसिंगपूर व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूर यांच्यावतीने तसेच सौ. रत्नाबाई मांगीलाल बजाज इंडस्ट्रियल पार्क यांच्या आर्थिक सहकार्याने जयसिंगपूर शहर व परिसरातील शिक्षण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय सेवा बजावलेल्या शिक्षकांना शिक्षक उत्कृष्टता पुरस्कार 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रम शनिवार दि. 27 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे शैक्षणिक व सामाजिक संघटक, साद माणुसकीची फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. हरीश बुटले, पुणे यांच्या शुभहस्ते तसेच असिस्टंट गव्हर्नर अविनाश टारे व सुदर्शन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले.
सदर पुरस्कार श्री. सहदेव केंगाळे, कलाश्री डॉ. बा.ग. पवार आलास बुबनाळ विद्यालय आलास, श्री. शितलकुमार कोले, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अब्दुललाट, श्रीमती. वंदना थोरात, मराठी शाळा कनवाड, कु. सुवर्णा हंकारे, नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर , श्री. संजय सुतार, लक्ष्मीनारायण मालु हायस्कूल, जयसिंगपूर व सौ. संस्कृती पाटील, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जयसिंगपूर यांना प्रदान करण्यात आला.
स्वागत रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष शिरीष भांडारे यांनी केले. प्रास्ताविक रोटरी क्लब जयसिंगपूरच्या सेक्रेटरी सौ. कोमल पात्रो यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख संतोष कदम यांनी करून दिली. रोटरी क्लब जयसिंगपूरचे अध्यक्ष सुदर्शन एडवान यांच्या हस्ते विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. हरीश बुटले यांनी शिक्षकांनी शैक्षणिक कार्य करताना जपावयाची नीतीमूल्ये विशद केली. तर यावेळी रोटरी क्लब जयसिंगपूर व विबग्योर सोलर, जयसिंगपूरचे आशुतोष चौगुले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धा पारितोषिक वितरण करण्यात आले. यामध्ये प्रथम क्र. पल्लवी सुधीर गंगधर, द्वितीय क्र. अनिरुद्ध सागर हजारे व तृतीय क्र. श्लोक परुळेकर यांनी पटकावले. तर त्यांना शिल्ड सर्टिफिकेट व रोख रकमेचे बक्षीस प्रदान करण्यात आले.
आभार रोटरी क्लब ग्रीन सिटीचे सेक्रेटरी महेश वाणी यांनी मानले. सूत्र संचलन आशुतोष चौगुले यांनी केले. यावेळी पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कुटुंबीय, नातेवाईक, विविध शिक्षक तसेच रोटरी क्लब जयसिंगपूर व रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी जयसिंगपूरचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.