![]()
दत्त नागरी संस्थेत स्व. भगवानराव घाटगे यांना अभिवादन
जयसिंगपूर : प्रतिनिधी

शिरोळ तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी यांना केंद्रस्थानी ठेऊन स्व. भगवानराव घाटगे यांनी काटकसर, बचत , प्रामाणिकपणा, जिद्द व चिकाटीच्या जोरावर श्री दत्त नागरी पतसंस्था व श्री गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून सर्वागीण विकास केला असून त्यांचे कार्य चिरंतर व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन श्री गुरुदत्त शुगर्स चे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी केले. स्व. भगवानराव घाटगे यांच्या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त जयसिंगपूर येथील दत्त नागरी पत संस्थेच्या प्रधान कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत स्व. घाटगे यांना अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी श्री .घाटगे बोलत होते.
स्व. भगवानराव घाटगे यांच्या कार्याचा आढावा घेताना श्री. घाटगे म्हणाले, स्व. भगवानराव घाटगे यांनी १९७५ साली १० हजार रुपयांच्या भागभांडवल वरती दत्त नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असून संस्थेने १०० कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे . श्री गुरुदत्त शुगर्स व श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था या नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या आहेत. स्व. घाटगे यांनी चिंचवाड गावात सेवा सोसायटी, पाणी पुरवठा संस्था आदी संस्थाची स्थापणा करून सामान्य शेतकर्याच्या व गरीबांच्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. स्व. घाटगे यांच्या विचाराचा व संस्काराचा वारसा आम्ही निश्चितपणे पुढे नेऊन चांगले कार्य करीत राहू असा विश्वास श्री. घाटगे यांनी व्यक्त केला.
दत्त नागरी चे चेअरमन शिवाजीराव माने -देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला गुरुदत्त शुगर्स चे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे, धीरज घाटगे, घाडगे फुड्स अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे डायरेक्टर आदित्य घाटगे , गुरुदत्त शुगर्सचे संचालक बबनराव चौगुले, शिवाजी सांगले , विठ्ठल घाटगे, पंतगराव गोधडे, केशव घाटगे, भाजपचे मंडळ अध्यक्ष महेश देवताळे , ज्योती गोधडे, दत्त नागरी पत संस्था व भगवानराव घाटगे सेवा सोसायटी चे सर्व संचालक मंडळ ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार जनरल मॅनेजर राजेंद्र चव्हाण यांनी आभार मानले .
गुरुदत्त शुगर्स मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत देणार .
महापूर ,कोरोना यासारख्या आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्स नेहमीच समाजाच्या पाठीशी राहिला. २००५, २०१९, २०२१ व २०२४ मध्ये आलेल्या महापुरामध्ये व २०१८ मध्ये केरळ मध्ये आलेल्या महापूरात हजारो पूरग्रस्तांना व जनावरांना गुरुदत्त परिवाराने आधार दिला आहे .बीड, सोलापूर,धाराशिव , लातूर हिंगोली , नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे . सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री गुरुदत्त शुगर्स परिवार महापुरातील सर्व पुरग्रस्तांना भरीव मदत देणार असल्याची माहिती यावेळी श्री. घाटगे यांनी दिली.