![]()
जयसिंगपूर :

शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात ज्यांनी विकासाची ज्योत प्रज्वलित करून सामान्य माणसांना जगण्याची हिमंत दिली असे व्यक्तिमत्व, शिरोळ तालुक्यातील सहकार, सामाजिक, शैक्षणिक व कृषी क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवुन देणारे, श्री दत्त नागरी सहकारी पत संस्था व श्री गुरूदत्त शुगर्स चे संस्थापक कै. भगवानराव घाटगे (मामा) यांचा आज (रविवार) पंधरावा स्मृतिदिन. यानिर्मित त्यांच्या कार्याचा आढावा.
शिरोळ तालुक्यातील चिंचवाड येथे २१ जुलै १९३८ रोजी भगवानराव घाटगे यांचा जन्म झाला. लहानपणा पासून ते करारी बाण्याचे म्हणून ते ओळखले जातात. वडिल गुंडूराम घाटगे यांच्याकडून त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. त्यांचे बालपण आणि प्राथमिक शिक्षण चिंचवाड येथे झाले. माध्यमिक शिक्षण सांगली व जयसिंगपूर येथे तर उच्च शिक्षण पुणे येथे झाले. आयुष्यभर प्रत्येकाने शिकत रहावे ही त्यांची संकल्पना होती. पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी दत्तवाड व इचलकरंजी येथे काही काळ शिक्षक म्हणून काम केले. त्या नंतर त्यांनी जयसिंगपूर येथे अडत दुकान सुरु केले. व्यापार व व्यवसायात एक पारंगत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गावात एस.टी सुरू करून ते सामाजिक व सार्वजनिक जीवनात आले. चिंचवाड गावातील लोकाच्या अडचणी, प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. २ जून १९५८ रोजी कोल्हापूरच्या राजाराम पाटील यांची कन्या विजयामाला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक जीवनात ते नेहमी आनंदी व समाधानी राहिले. त्यांची मुले माधवराव, अरूणराव, आशालता व पुष्पलता यांना पदवधीर करून चांगले शिक्षण दिले. दोंन्ही मुलांना व्यावसायिकदृष्या सक्षम बनविले. पंधरा वर्ष त्यांनी चिंचवाड गावाचे सरपंच म्हणून काम केले. तसेच त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषदमध्ये प्रतिनिधित्व करून गावासोबतच भागाचा विकास केला. तरुण वयातच त्यांनी १९७५ ला गावातच श्री दत्त नागरी पतसंस्थेची स्थापना केली. पत संस्थेच्या माध्यमातून जपलेली विश्वासार्हता व आर्थिक समृद्धीतून झालेली वैचारिक परिवर्तनाची क्रांती हितार्थ ठरली .
शेतीवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. उत्तम शेतकरी म्हणून देखील ते परिचत होते. शेतीसाठी पाणी पुरवठा ही संकल्पणा त्यांनी पुढे आणली व चिंचवाड येथे ती राबवली. शेतीला पाणी मिळावे, खते-बियाणांची सोय व्हावी म्हणून त्यांनी सेवा सोसायटीची स्थापणा केली व चांगल्या पध्दतीने चालवुन दाखवली. गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यानी गावातच शिक्षण संस्था स्थापण केली. तसेच गावात आध्यात्मिक व धार्मिक वातावरण चांगले ठेवण्यासाठी त्यांनी गावात दत्त मंदीराची उभारणी केली. शिवाय प्रजापिता ब्रम्हाकुमारी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शांततेचाव मानवतेचा प्रचार व प्रसार केला. शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी २००४ साली रोजी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी येथे पहिला खाजगी श्री गुरुदत्त शुगर्स लि; हा साखर कारखाना अत्यंत दूरदृष्टीने स्थापण केला. या कारखान्याने शेतकरी हा केंद्र बिंदू मानत आपले नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले. आज हा कारखाना शेतकऱ्यांच्या जीवणातील मैलाचा दगड बनला आहे. त्यांच बरोबर त्यांनीश्री दत्त फुडच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाशी त्यांनी संपर्क ठेवला आणि केळीवर प्रक्रिया करणारा उदयोग ही त्यांनी निर्माण केला. स्व. भगवानराव घाटगे हे परखड व स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी कधीच लाचारी स्विकारली नाही व आपला स्वाभिमान कधीच गहाण ठेवला नाही. घाटगे ब्रँड ही ओळख त्यांनी आपल्या स्वः कर्तृत्वावर तयार केली. (स्व.) भगवानराव घाटगे यांनी उभे केलेले सामाजिक काम व त्यांच्या विचारांचा व संस्काराचा वारसा त्यांचे सुपुत्र कारखान्याचे विदमान चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे अत्यत कुशलतेने व शेतकरी हित डोळ्यासमोर ठेऊन कार्यरत आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे व धीरज घाटगे हे देखील सक्षमपणे काम करीत आहेत. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता समाजासाठी दिलेले योगदान, सामाजिक बांधिलकी यामुळे कै. भगवावराव घाटगे हे समाजातील सामान्य लोकापर्यंत पोहचले आहे. आता उरलो उपकारापुरता असे यर्थाथ जीवण जगत असतानाच २८ सप्टेबर २०१० मध्येते अनंनात विलिन झाले आणि एक झंझावाती परिवर्तनाचे वादळ शमले.
