गवसे येथील ११ के.व्ही. सोलर वाहिनीचे लोकार्पण

Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स

आजरा : हसन तकीलदार

३३/११ के.व्ही.गवसे उपकेंद्र येथे ११ के.व्ही. मेगावॅट हरपवडे सोलर वाहिनीचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.भारतातील २४५८ क्षमतेच्या एकूण ४५४ सौरऊर्जा प्रकल्पांचे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या शुभहस्ते पार पडले.हरपवडे ग्रामपंचायत हद्दीत ४ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात आला असून या सौर प्रकल्पामुळे ३३/११ के.व्ही.गवसे उपकेंद्रामधून विद्युत पुरवठा होणार्‍या गवसे पंचक्रोशीतील १०२५ कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा देणे शक्य होत आहे. समारंभाच्या अध्यक्षस्थानी गडहिंग्लज विभाग कार्यकारी अभियंता संजय पोवार होते.आज पर्यंत गडहिंग्लज विभागांतर्गत अनुक्रमे माणगाव, हरळी, दुंडगे व हरपवडे असे एकूण १८  मेगावॅट क्षमतेचे ०४ सौर विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाले असून अजून विभागअंतर्गत एकूण २८ मेगावॅट क्षमतेचे १३ सौर विद्युत प्रकल्पांचे काम प्रगती पथावर आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी कोल्हापुर मंडळ अधीक्षक अभियंता गणपती लटपटे, कोल्हापुर परिमंडळ मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी सागर पाटील सरपंच ग्रामपंचायत हरपवडे यांचा सदर महत्वकांक्षी प्रकल्पास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सत्कार करण्यातआला. दिवसा शेतीस विद्युत पुरवठा उपलब्ध होणार असल्याने उपस्थितानी तसेच शेतकरी यांनी आनंद व्यक्त करून महावितरणचे मनोगतातून आभार व्यक्त केले. या प्रकल्पाचे काम हे मे.एम.एस.के.व्ही.वाय.थर्ड सोलर एस.पी.व्ही.लि.मुंबई यांनी यशस्वी रित्या पार पाडले असून लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आजरा उपविभागाचे उप.कार्यकारी अभियंता, सर्व सहाय्यक अभियंता, सर्व जनमित्र,कर्मचारी,सदर प्रकल्पाचे प्रतिनिधी व बहुसंख्य लाभार्थी शेतकरी सदर सोहळ्यास उपस्थित होते.नवीन वाहिनीचे उद्घाटन कार्यकारी अभियंता पोवार यांच्यासह सागर पाटील सरपंच ग्रामपंचायत हरपवडे गोविंद गुरव (माजीसरपंच ग्रामपंचायत हरपवडे),मुकुंद तानवडे,डॉ.धनाजी राणे,आदी ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *