मोरजकर महाराज समाधी घाटाचे संवर्धन काळाची गरज

Loading

आजरा : हसन तकीलदार

निसर्गाची मुक्त उधळण करणारा तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव म्हणजे आजरा होय. अंदाजे 18 व्या शतकातील हिरण्यकेशी घाटावर लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज समाधी व पुरातन ब्रम्हलिंगेश्वर मिंदीर आहे. शिल्हारकाळातील बांधकाम असल्याचे काही तज्ञाचे मत आहे. पुरातन बांधकाम असलेले मंदिर, घाट आणि समाधी ऐतिहासिक वारसा जपत आजऱ्याच्या सौंदर्यात भर करण्याबरोबरच भक्तांचे श्रद्धास्थान बनले आहे. मात्र आजची अवस्था या शिळाकडे पुरातत्व व सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे आणि शिलांचे जतन करणे काळाची गरज बनली आहे.
रामतीर्थ हे पावन परिसर, व्हिक्टोरिया पूल, जुने तहसील कार्यालय, व्यंकटराव हायस्कुलची जुनी इमारत या सर्व ब्रिटिशकालीन ठेवे आहेत. आणि 18 व्या शतकातील फार मोठे संत लक्ष्मणबुवा मोरजकर महाराज यांची समाधी व ब्रम्हलिंगेश्वर मंदिर दगडानी बांधलेले घाट हिरण्यकेशी नदीकाठावर स्थित आहे. सध्या हा घाट अत्यंत दयनीय परिस्थितीत असून आजऱ्याचा ऐतिहासिक वारसा जपणारा हा घाट आता अंतिम श्वास मोजत आहे. शेकडो वर्षे या घाटाच्या दगडी बांधकामाला धक्का सुद्धा लागला नव्हता. परंतु या ठिकाणी काहीवेळा अवजड वाहने येतात. यावर्षी पाऊसही अधिक प्रमाणात आहे त्यामुळे खालची जमीन नरम झाली होती. या दगडांवर वाहने आणि क्रेन आणल्यामुळे घाटाची दुरावस्था झाली आहे. जुनी घडाऊ दगडे पुन्हा जुन्या स्वरूपात बसवली गेली नाहीत तर  भविष्यात आपल्या पिढीला अशा ऐतिहासिक वास्तूला मुकावे लागणार. केवळ फोटो आणि चित्रफीत पाहूनच भावी पिढीला समाधान मानावे लागेल. 
आणखी महत्वाचे म्हणजे हिंदू समाजाची स्मशानभूमी आहे. बहुतांशी हिंदू समाजातील अंत्यविधी या ठिकाणीच पार पडतात. कोणतेही धार्मिक विधी करताना किंवा पुजापाठ करताना पावसाळ्यात किंवा इतर वेळी अडचणी निर्माण होतात. यासाठी येथे एखादा निवारा असणे गरजेचे आहे. आजऱ्याच्या पहिल्या महिला सरपंच कै.शांताबाई केशव टोपले यांनी या ठिकाणी निवारा बांधला. परंतु आज त्याचीही दुरवस्था झाली आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा हा ऐतिहासिक वारसा असलेला घाट टिकवण्याचा करण्याची गरज असल्याचे अभिषेक रोडगी, गौरव देशपांडे आणि गणेश डोणकर म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *