![]()
एनपीटीईएल कोर्समध्ये देश पातळीवर टॉप कॉलेजेसमध्ये समावेश

यड्राव : प्रतिनिधी
येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एनपीटीईएल (नॅशनल प्रोग्रॅम ऑन टक्नॉलॉजी इनहान्सड लर्निंग) मध्ये देशपातळीवर सर्वोत्तम महाविद्यालयात समावेश झाला आहे. याबद्दल आयआयटी मुंबई येथे आयआयटी चेन्नई एनपीटीईल प्रोजेक्ट मॅनेंजर भारती बालाजी यांच्या हस्ते समन्वयक प्रा. जी. व्ही. पुजारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये प्रा. विनोद नेजकर यांनी फॅकल्टी डोमेन अॅडव्हान्सड कोर्स पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयआयटी मुंबई एनपीटीईल प्रमुख डॉ. नंदीता महादेवन उपस्थीत होत्या. सलग दुस-यांदा महाविद्यालयाचा असा सन्मान होत आहे.
NPTEL हे सात भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी बॉम्बे, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास आणि रुरकी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) द्वारे अभ्यासक्रम सामग्री तयार करुन ते प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना पुरवेल जाते. त्याचे कोर्स असून त्याचे परिक्षा घेतल्या जातात.
शरद इन्स्टिट्युट २०१८ पासून एनपीटीईलचे कोर्स महाविद्यालयात राबवित आहे. देश पातळीवर विविध आयआयटीकडून स्वयंम एनपीटीईएलची परिक्षा घेतली जाते. आतापर्यंत दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यी हा कोर्स पूर्ण केला आहे. एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या परिक्षेत महाविद्यालयातील १२ टॉपर, १३ गोल्ड, ३३० इलाइट, १२४ सिल्व्हर तर ४५६ विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला आहे. महाविद्यालयातील ४० प्राध्यापकांनी ती पूर्ण केली आहे.
संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी प्राध्यापक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.