जिल्हा बँकेचे कर्मचारी सूर्यकांत कांबळे प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त

Loading

गरिबाला पण लोक देतात शुभेच्छा! शुभेच्छा दिल्याने ते गहिवरले

जयसिंगपूर : प्रतिनिधी

येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण संस्थेचे विद्यमान चेअरमन आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेचे या शहरातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. आज त्यांना सेवानिवृत्ती निमित्त सर्वांनी शुभेच्छा दिल्या. एका गरिबाला सेवानिवृत्त सेवेत शुभेच्छा देण्याचे दर्शन हे आज दिसून आले.

आज विभागीय कार्यालय जयसिंगपूर येथे कार्यालयीन सहकारी श्री सूर्यकांत कांबळे सेवानिवृत्त झाले आहेत.त्यानिमित्त विभागीय कार्यालय जयसिंगपूर तसेच माजी विभागीय अधिकारी श्री. ए.बी.पाटील तालुक्याचे तपासणी अधिकारी श्री. ए. एस. पाटील शाखा जयसिंगपूर स्टाफ व तालुक्यातील सर्व निरीक्षक तसेच जयसिंगपूर शाखेचे संगणीकरणाचे क्लस्टर प्रमुख श्री अनिरुद्ध वसगदडेकर या सर्वांनी श्री सूर्यकांत यांना निवृत्ती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्तीनंतर ही त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *