![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर नगर परिषदेने संभाव्य पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर केली आहे. दरम्यान मागील निवडणुकीमध्ये रंगतदार ठरलेली बहुचर्चित प्रभाग क्रमांक सात मध्ये या वर्षी मोठा घोळ झाल्याचे हरकतदारांनी सांगितले आहे. मागच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मध्ये असलेले संभाजीनगरचा उल्लेख यावेळी प्रभाग क्रमांक सात मद्दये नाही.त्यामुळे या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये संभाजीनगरचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळलेला आहे असा आरोप येथील रहिवासी संतोष बाबुराव जाधव, सुरज छगनसिंह रजपूत, संदीप कोळी, राजू बाबुराव मोरे यांनी केला आहे. तसेच या जाहीर केलेल्या प्रभाग रचनेमध्ये प्रभाग सात मध्ये अनेक त्रुटी आढळल्याने हा प्रभाग आराखडा रद्द करावा अन्यथा न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची तक्रार मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी गवळी जयसिंगपूर यांच्याकडे केली आहे.अशा आशयाचे निवेदन यातील हरकतदारांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे पत्रकारांना देत माहिती दिली आहे.

तर पूर्वीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये संभाजीनगरचा उल्लेख आहे.या प्रभाग क्रमांक सात मध्ये मोठमोठ्या नेते मंडळींनी लक्ष घातले होते. त्यामुळे रंगतदार अशी लढत या ठिकाणी झाली होती. या प्रभागामध्ये माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे विरुद्ध नवका उमेदवार गणेश गायकवाड यांच्यात जबरदस्त लढत झाली होती.यामध्ये गणेश गायकवाड निवडून आले होते.
दरमयान होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सध्याच्या प्रभाग रचनेमध्ये जाणीवपूर्वक संभाजीनगर या नावाचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. असे का. या भागातील नागरिक हे परप्रांतीय आहेत का? यापूर्वी संभाजीनगरचा उल्लेख असताना आत्ता राजकीय हेतूने हे कृत्य करण्यात आले असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. संतप्त झालेले वरील तक्रारदार न्यायालयात धाव घेऊन दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
पुढे निवेदनात असेही म्हटले आहेत की, प्रभाग रचना बदलताना नेमक्या कोणत्या गोष्ठीचा विचार केला गेला. याचा कुठलाही तपशील नकाशामध्ये दिलेला नाही. त्याचे स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे तयार केलेली प्रभागरचना ही जाणूनबुजुन व खोडसाळपणाने आमच्यातील काही जणांचे राजकीय अस्तित्व धोक्यात यावे ,आणि आमचाच उमेदवार निवडून यावा, त्यांना कोणतीही अडचण होऊ नये, निवडणूक एकतर्फी व्हावी या उद्देशाने याच कारणाने केलेले असलेनेही आमची त्यास हरकत आहे.असे हरकतदारांनी म्हटले आहे.महाराष्ट्र शासनाचे जनरल व स्पेशल ऑर्डर्स काय आहेत याबाबत देखील माहिती न पुरविता मंजुर करणेचे ठरविलेला प्रभाग आराखडा रद्द करणेत यावा.रद्द करता येत नाही. या निर्णयास आपण आलेस त्यामध्ये संभाजीनगरचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे.अन्यथा दिवाणी कोर्टात त्याबाबत दाद मागावी लागेल असे तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.आता या घेतलेल्या हरकतीवर पुन्हा एकदा शहरात प्रभाग रचनेवरून धुमाकूळ होणार आहे. घेतलेल्या हरकतीवरून या भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे. पालिका प्रशासन याबाबत कितपत गांभीर्याने घेते की हरकतदार न्यायालयीन लढ्यामार्फत न्याय मिळवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

