![]()
शांतता व सुव्यवस्थेसाठी दंगल काबू प्रात्यक्षिक


आजरा : प्रतिनिधी
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमिवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आजरा पोलिसांकडून गणेचतुर्थीच्या आधी पोलीस पथ संचलन व दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके करण्यात आली. ज्यामध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस जवान आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठ व गल्ल्यातून वाहनासहित पथसंचलन केले. नागरिकांत सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि नियमांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी यासाठी पोलीस पथसंचलन केले.
जनजागृती, सुरक्षितता, कायद्याचा आदर आणि नियमांची जाणीव करून देणे हे यामागचे मुख्य उद्देश असतात. सर्वांनी एकत्र येत शांततेत सण साजरा करावा, अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेतली. आजरा पोलीस ठाण्यापासून तहसील कार्यालय, मुख्य बाजारपेठ व इतर गल्ल्यातून हे पथसंचलन करण्यात आले. आठवडा बाजार असलेने व गणपतीचा बाजार करण्यासाठी लोकांची गर्दी होती. सायरन करीत संचलन केल्याने लोकांचे कुतूहलही वाढले.
उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन व दंगा काबू प्रात्यक्षिके करण्यात आली. आजरा एस. टी. स्टॅंडवर दंगा काबू पथकाद्वारे प्रात्यक्षिके करताना लोकांची गर्दी झाली. सर्वजण उत्सुकतेने हे सर्व बघत होते. यामध्ये राखीव पोलीस दलाच्या जवानासह आजरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनीही सहभाग घेतला.
