श्री गुरुदत्त शुगर्स ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार प्रदान

Loading

विस्मा तर्फे कारखान्याचा सन्मान

कुरुंदवाड : प्रतिनिधी

वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन (विस्मा) यांच्या वतिने सन २०२५ मध्ये दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ बायोएनर्जी उत्पादक (जैवउर्जा उत्पादन) पुरस्कार टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त शुगर्स यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथे विस्मा संस्थेच्या वतीने आयोजित शुगर व बायोएनर्जी पुरस्कार वितरण कार्यक्रमात हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व विस्मा चे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांच्या हस्ते स्विकारला.

कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांनी साखर कारखान्यामध्ये नव – नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत बायोएनर्जी विभागावर भर दिला आहे .श्री. घाटगे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने प्रतिदिन २ लाख लिटर इथेनॉल निर्मिती प्रकल्प यशस्वीपणे चालु आहे. या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या स्पेंटवॉश या टाकाऊ पदार्थपासून कारखान्याने बायोडायजेस्टरच्या माध्यमातून प्रतिदिन २५ एन.एम.क्युब बायोगॅस उत्पादन सुरू केले आहे. हा बायोगॅस बॉयलर मध्ये वापर केल्यामुळे प्रतिदिन ५० टन बगॅसची बचत करण्यात कारखान्याला यश आले. बायोडायजेस्टर मधून बाहेर पडणाऱ्या स्पेटवॉश ला पोटॅश पावडर मध्ये रूपांतर करण्यासाठी स्पेंटवॉश ड्रायर बसवण्यात आला आहे. या ड्रायरसाठी चिमणी मधून बाहेर जाणाऱ्या धुराचा वापर करून प्रतिदिन ३० टन पोटॅश पावडरचे उत्पादन केले जात आहे. पोटॅश पावडरवर नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्रॅन्युशन प्लॅन्टच्या माध्यमातून सर्व पिकांना उपयुक्त दाणेदार ‘त्रिमूर्ती पोटॅश ‘ खताचे उत्पादन घेण्यात यश आले. स्पेंटवॉश मधून दाणेदार पोटॅश खताचे उत्पादन घेणारा गुरुदत्त शुगर्स हा देशातील अगदी मोजक्याच साखर कारखान्यापैकी एक आहे.
उत्पादित करण्यात येत असलेले पोटॅश खत ऊस पुरवठा करणारे शेतकरी यांना बिनव्याजी क्रेडिटवर अल्प दरात उपलब्ध करून देत असल्याची माहिती दिली.

चौकट (बाईट )

श्री गुरुदत्त शुगर्स ने तांत्रिक कार्यक्षमता व बायोएनर्जी विभागात वेगवेगळे प्रयोग राबवून ते यशस्वी केले आहेत. त्याची दखल विस्मा या संस्थेने घेऊन कारखान्याला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे. कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कठोर परिश्रम व योगदानाला ह्या पुरस्काराचे सर्व श्रेय जात आहे.आतापर्यंत कारखान्याला आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय व देशपातळीवरील तेरा पुरस्कार प्राप्त झाले आहेत .

    माधवराव घाटगे 

( चेअरमन – श्री गुरुदत्त शुगर्स )

फोटो लाईन –
वेस्ट इंडिया शुगर मिल असोसिएशन (विस्मा) चा राज्यस्तरीय उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादकता पुरस्कार राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *