![]()
शिरोळ : प्रतिनिधी –
भास्कर भूषण न्यूज नेटवर्कच्या वतीने शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल विष्णू लोंढे यांना सामाजिक क्षेत्रातील स्टार आयकॉन अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह (बिबवेवाडी ) येथे संपन्न झाला. यावेळी राज्य शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळालेबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने (शिरोळ ) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
अनिल लोंढे यांनी गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात आदर्शवत काम केले असून समाजाच्या विविध प्रश्नाबाबत आंदोलने केली आहेत. सर्वसामान्य ,गोरगरीब ,गरजू व निराधार अशा घटकासाठी ते लढा देत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रिंट इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया मधील नामांकित भास्कर भूषण या संस्थेने त्यांचा गौरव केला. या समारंभास भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्तीताई देसाई, प्रसिद्ध ॲक्युपंचर उपचार तज्ञ लेखिका सुमिता सातारकर, प्रसिद्ध लावणी साम्राज्ञी, अभिनेत्री प्रमिला सुर्यवंशी – लोदगेकर, डॉ. पियु धनवडे – कोल्हापूरकर, जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दिलीप जगताप, प्रतिभाताई धस, ह भ प नंदकुमार शेटे, डॉ दगडू माने, भास्कर भूषणचे कार्यकारी संपादक डॉ राजीव लोहार, मनीषाताई लोहार, विवेक गुरव आदि उपस्थित होते.

