![]()
आजरा तालुका प्रतिनिधी : राजाराम कांबळे



जेऊर येथे कॉ संजय तर्डेकर यांचे नवीन घराचा गृहप्रवेश समारंभ परिवर्तनाच्या विचारांची रुजवणूक करून झाला. समतेच्या प्रस्थापनेसाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणाऱ्या सर्वच महामानवांना वंदन करून हा गृहप्रवेश समारंभ उत्साहात साजरा झाला. प्रथा आणि परंपरेनुसार मंत्रवत होम हवन न करता क्रांतीबा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न भारत भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाच्या जनक माता.सावित्रीबाई, माता रमाई यांचे प्रतीमाना वंदन करून तसेच आईवडीलांचे पायु धुवुन त्यांना वंदन केले आणि माता पितांच्या हस्तेच रिबीन कापून गृहप्रवेश करण्यात आला.
महात्मांच्या अथवा युगपुरुषाच्या जंयतीना आनास्तव खर्च करण्यापेक्षा त्यांचे विचार जोपासले पाहिजे आणि समाजात त्यांचे विचार रुजवले पाहिजेत तर विचारवंताचे आचार, विचार, पुढे नेऊन एक परीवर्तन वादी पिढी घडवता येईल. अशी प्रतिक्रिया उपस्थितातून उमटली. श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब शोषीत चळवळीचा बुंलद आवाज कॉ . संजय तर्डेकर (जेऊर ) यांनी छ. शिवाजी महाराज, जोतिबा फुले, डॉ. आंबेडकर,
शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून गृह प्रवेश केला .
यावेळी जनता दलाले नेते – कॉ . बाळेश नाईक, समाज प्रबोधनकार कॉ . नवनांत शिंदे, कॉ. शिवाजी गुरुव, पत्रकार – जोतिप्रसाद सावंत, राजाराम कांबळे, रणजित कालेकर, संभाजी जाधव, हसन तकीलदार, शिक्षक संघटनेचे आणि समितीचे नेते ,बौद्ध उपासक भिकाजी कांबळे यांच्या सह सर्व श्रमिक संघटनांचे प्रतिनिधी गावकरी अबाल वृद्ध उपस्थित होते.