![]()
आजरा : हसन तकीलदार

तालुक्यातील आवंडी गावातील लोकांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले असून आपल्या वाडवडिलांची आठवण म्हणून जपलेली घरे सोडून शेजारच्या तालुक्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी गांधीनगर जवळील आवंडी वसाहतीत जड अंतःकरणाने येऊन राहिले. ज्यांनीआपल्या घरादाराचा,शेतीचा त्याग केला त्यांनाच आज अनेक समस्यांनी ग्रासले असून त्यांना आज आपल्या मूलभूत सुविधासाठी संघर्ष करावा लागत आहे. जमिनी गेल्या त्यावेळीही संघर्ष करावा लागला आणि आताही त्यांना संघर्ष करावा लागतो हे दयनीय आहे. कचरा डेपो जवळील कचरा वसाहतीजवळ टाकत असल्यामुळे दुर्गंधीचा सामना हे लोकं करीत आहेत. वेगवेगळ्या आजरांना बळी पडत आहेत. दोन चार दिवस आड पाणी येते. पथदिवे गायब झाले आहेत. गुल आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास तर सुरुच आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजरा अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली आवंडी वसाहत वाल्यांनी नगरपंचायत कडे कूच केली.यावेळीसर्व समस्यांचा पाढा वाचण्यात आला. एकेक प्रश्नावर सविस्तरचर्चा झाली.त्यानुसार मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्वसमस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मुख्याधिकारी सूरज सुर्वे म्हणाले की,आवंडी वसाहतीच्या आजूबाजूला टाकलेला सर्व कचरा तातडीने साफ करण्यात येईल. वासहत परिसर व शेजारील मैदान याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही. याचीदक्षता घेतली जाईल.त्याचप्रमाणे आवंडी वसाहतीमध्ये यापूर्वीएक किंवा दोन दिवस आड पाणीपुरवठा होता. त्याचीही दखल घेत रोज सकाळी पाच ते सहाच्या दरम्यान पाणी सोडण्याची व्यवस्था केली जाईल.त्याचप्रमाणे ज्या कनेक्शनना पाणी कमीदाबाने येते त्यावरही उपाय योजना केली जाईल.पथदिव्यासाठी विजतांत्रीची सोय होताच बंद असलेली पथदिवे लावण्यात येतील अशी सकारात्मक भूमिका घेत मुख्याधिकारी यांनी उपस्थिताना आश्वासन दिले.याबरोबरच त्यांनी लोकांना आवाहन केले की, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून घंटा गाडीत टाकावा.मनुष्यबळ कमी असलेने ओला व सुका कचरा वेगळा करणे अडचणीचे असून त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थित विल्हेवाट होत नाही व परिणामी दुर्गंधी पसरते.आपल्या आरोग्याची काळजी घेत दोन वेगवेगळ्या बादल्यामध्ये ओला आणि सुका कचरा गोळा करून घंटागाडीत टाकावा.जे लोक असे करणार नाहीत त्यांचा कचराघंटा गाडीत घेतला जाणार नाही असेही मुख्याधिकारी तसेच आरोग्य अधिकारी अमर कांबळे यांनी सांगितले.
यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांच्यासहअन्याय निवारण समितीचे सर्व पदाधिकारी व आवंडी वसाहतीतील महिला आणि नागरिक उपस्थित होते.

