![]()
यड्राव : प्रतिनिधी

येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या १५ विद्यार्थ्यांची राणे मद्रास लिमिटेड नामांकित कंपनीत निवड झाली. महाविद्यालयातील मेकॅट्रॉनिक्स, इलेक्टॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल विभागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली.
मेकॅट्रॉनिक्स विभागातील प्रियंका देवकाते, अंजली एकसंबे, तनुजा वडगे, सायली खडके, प्रगती पाटील, विशाखा पाटील, नम्रता पाटील, अशिका शेट्टी, प्रणाली चौगुले, इलेक्टॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमधील श्वेता सांगले, तपस्या जाधव, मोक्ष तकडे, प्राजक्ता जाधव, इलेक्ट्रीकलमधील कोमल पाटील, अक्षता हिरेमठ यांची निवड झाली.
राणे (मद्रास) लिमिटेड ही राणे ग्रुप ऑफ कंपन्यांचा एक भाग आहे. जी स्टीअरिंग आणि सस्पेंशन सिस्टीमच्या निर्मिती आणि वितरणात गुंतलेली आहे. कंपनीने उत्पादित केलेल्या मुख्य घटकांमध्ये मॅन्युअल स्टीअरिंग, गियर प्रॉडक्ट्स (एसजीपी) आणि सस्पेंशन अँड स्टीअरिंग लिंकेज प्रॉडक्ट्स (एसएसएलपी) यांचा समावेश आहे. इतर उत्पादनांमध्ये टाय रॉड असेंब्ली, ड्रॅग लिंक असेंब्ली, सेंटर लिंक असेंब्ली आणि गियर शिफ्ट बॉल जॉइंट्स यांचा समावेश आहे. त्यांची उत्पादने अशोक लेलँड, व्होल्वो, एम अँड एम, टाफे, टाटा आणि इतर अनेक ऑटोमोबाईल कंपन्याचा समाविष्ट आहेत. टाटा मोटर्स त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. कंपनीचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.
महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बेस्ड लर्निग अंतर्गत सुरू असलेल्या अॅक्टीव्हिटी स्लॉटमध्ये मुलांच्याकडून ग्रुप डिसक्शन, इंटरव्ह्यु टेक्नीक्सचा सराव करून घेण्यात आला आहे. व्हॅप अंतर्गत व प्रोजेक्ट बेसड लर्निंग याचा फायदा विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी झाला.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेलचे प्रा. नेहा प्रसून यांच्यासह सर्व डिन, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
