टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम

Loading

दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा

आजरा : प्रतिनिधी-

येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम संपन्न झाला. लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आलाय. अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिस देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते. प्रमुख वक्ते मच्छिंद्रनाथ गुरव यांनी अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिभावान कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले, तर ज्येष्ठ अध्यापक व्ही. के. गावडे यांनी टिळकांच्या राष्ट्रनिष्ठेवर भाष्य करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी टिळकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर आढावा घेतला.

लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमा पूजन झाले. विद्यालयाचे प्राचार्य आर. पी. पाटील यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कु. सृष्टी गावडे हिने केले.तर विद्यार्थिनी स्वरा गडकरी, गार्गी गावडे, अनन्या गुरव, स्पृहा पाटील आणि संभव कुंभार यांनी लोकमान्य टिळक आणि साठे यांच्या विचारांचा गौरव केला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संजय साबळे, अमरकांत पाटील, व्ही. एस. मोहनगेकर, टी. व्ही. खंदाळे, वैशाली पाटील, शरद हदगल, ओंकार पाटील, प्रियाराणी बुरुड आदी मान्यवर उपस्थित होते. कु. आदिती सूर्यवंशी व रिया मुजावर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर आभारप्रदर्शन कु. श्रेयशी तेजम हिने मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *