![]()
जयसिंगपूर : प्रतिनिधी

जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयच्या संघाने बुद्धिबळ स्पर्धेत (मुले) तृतीय क्रमांक पटकावला. महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी (जि. अहिल्यानगर) येथे स्पर्धेत हे यश मिळविले.स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे जॉईन सेक्रेटरी राजेंद्र कोंडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाची सहयोगी अधिष्ठाता डॉ.आर.डी. बनसोड यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून १० जिल्ह्यातील ३४ संघ सहभागी झाले होते. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ-राहुरीचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एस बी भांगे, क्रीडा अधिकारी डॉ. व्ही आर आवारी उपस्थित होते.स्पर्धेत शरद कृषीचे खेळाडू आदित्य खिलारे (कॅप्टन), शिवलिंग वाणी, वैभव शिंदे, वसीम फकीर, श्रेयस कोळी हे सहभागी झाले होते. यामध्ये आदित खिलारे यांनी आठ स्पर्धेपैकी आठ जिंकून विद्यापीठच्या संघात प्रथम स्थान मिळवले. व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या संघात निवड झाली आहे. त्यांना शरद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. सारिका कोळी, उपप्राचार्य संजय फलके, क्रीडा शिक्षक दादासाहेब मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. कल्याणी जाधव होत्या.या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत निवड होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.