माणुसकीचे दुर्लभ दर्शन : दर्गा गल्लीतील युवकांनी गरीब रुग्णाला केली आर्थिक मदत

Loading

आजरा : हसन तकीलदार

हुक्केरी तालुक्यातील मैसूरगप्पी गावातील 27 वर्षीय तरुणी ब्रेनट्यूमरने ग्रस्त आहे. तिच्या वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असून ती मदत केली. आजच्या युगात दुर्लभ असणारे हे माणुसकीचे दर्शन झाले.

ही मदत गोळा करण्यासाठी आजऱ्यात आलेल्या तिच्या वडिलांचे हृदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यू झाले होते. त्यामुळे दर्गागल्लीतील काही युवकांनी पुढाकार घेत स्वतः आर्थिक मदत गोळा करून तिच्या गावी जाऊन ती मदत त्यांच्या घरात देऊन आले. हुक्केरी तालुक्यातील मैसूरगुप्पी गावचे जहांगीर इनामदार यांच्या 27 वर्षीय मुलीला ब्रेनट्यूमर सारख्या आजाराने ग्रासले. त्यामुळे या मुलीला दवाखान्यात दाखल करून जहांगीर इनामदार आजऱ्यामध्ये आर्थिक मदत गोळा करण्यासाठी मागच्या आठवड्यात आले होते. दर्गागल्लीतील मस्जिद मध्ये मदत गोळा करून जाताना गल्लीत रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यु झाला.

त्यावेळी तेथील युवाकांनी माहिती घेऊन कोवाड मधील नातेवाईकांशी संपर्क साधला. मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर दर्गागल्लीतील काही युवक पुढे आले आणि त्यांच्यासाठी आर्थिक मदत गोळा केली. मैसूरगुप्पी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांच्या मदत स्वाधीन केली. अत्यंत बिकट आणि गरिबीत असणाऱ्या आणि सर्व जमापुंजी दवाखान्यात खर्च केलेल्या त्या कुटुंबाला आर्थिक गरज होती. हे त्यांच्या घरात गेल्यानंतर कळले. यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रेहान तकीलदार म्हणाले की, समाजातून मोठ्या प्रमाणात सदका फितराची रक्कम मदत म्हणून गोळा केली जाते. परंतु ही रक्कम योग्य ठिकाणी व योग्य माणसांच्या हाती जात नसल्याने आज समाजात असे प्रसंग उद्भवत आहेत. यासाठी समाजाने एकत्रित येत अशा गोष्टीवर निर्बंध आणून जे याचा व्यवसाय मांडला आहेत त्यांच्यावर अंकुश आणले पाहिजे.

कोणताही गरीब शिक्षण, मुलींची लग्ने, आजारपण, दवाखाना यासाठी वणवण फिरणार नाही. त्यामुळे समाजाने योग्य ठिकाणी आपला पैसा द्यावा असे आवाहन करण्यात आले. यावेळी रेहान बशीर तकीलदार (शिवसेना उबाठा वॉर्ड प्रमुख ), नौशादभाई बुडडेखान (सामाजिक कार्यकर्ते ),बबलू तकीलदार, बैजू शकील तकीलदार,बाबाजान तकीलदार, अशपाक तकीलदार, अर्शद बुडडेखान, सद्दाम तकीलदार, शम्स तकीलदार, आरिफ लतीफ सर, असिफ तगारे, आतिफ तकीलदार, अबू मालदार आदिजणांनी यात सहभाग नोंदवला.तकीलदार वेलफेअर ट्रस्ट यासाठी भरीव कार्य सुरु करीत आहे असे यावेळी स्पष्ट केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *