![]()
विधानसभेत लक्षवेधी मागणी
चंदगड प्रतिनिधी- बेळगांव-वेंगुर्ला मार्ग राष्ट्रीय महामार्ग करावा यासंबंधी आज विधानसभेत लक्षवेधी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड तालुक्यातुन जाणारा बेळगांव-वेंगुर्ला मार्गावर गेल्या काही वर्षभरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले हे स्पष्टीकरण करीत, यामुळे दरवर्षी किमान ६० ते ७० निष्पाप लोकांचे नाहक बळी गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा मार्ग वर्दळीचा असल्याने यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. परंतु या राज्यमार्गाची रुंदी कमी असल्याने वाहतुकीची कोंडी होते व दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या बेळगांव-वेंगुर्ला राज्यमार्गास राष्ट्रीय महामार्ग करावा, जेणेकरून या मार्गाचा विकास होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल.

त्याचबरोबर याचा चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्यालगतच्या गावांना व्यावसायिक दृष्ट्या मोठा फायदा होईल असे ते म्हणाले.