शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठपुराव्याला यश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठपुराव्याला यश

Loading

कायमस्वरूपी मिळाला वैद्यकीय अधिकारी

आजरा : हसन तकीलदार

आजरा शहरात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने “हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” एक वर्षांपूर्वी चालू करण्यात आला होता.पण या दवाखान्यात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना सेवा मिळत नव्हती. शिवसेना (उबाठा च्या ) वतीने अनेक वेळा निवेदने देऊन तसेच सतत पाठपुरावा केल्यामुळे काही दिवसापूर्वी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दवाखान्यात रुजू झालेल्या डॉ.मुबस्सीरा मॅमेल यांचा शिवसेनेच्या वतीने युवराज पवार (तालुका प्रमुख )यांनी सत्कार केला आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या या दवाखान्यात गोरगरीब रुग्णांना दर्जेदार व वेळेत सेवा मिळावी अशी सूचना करण्यात आली.

यावेळी आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी काटकर, कौस्तुभ पाटील,स्वप्निल कोगेकर, अधिपरिचारक, शाहीद मालदार (एम. पी.डब्ल्यू.) याचबरोबर शिवसेनेचे संजय सावंत,(उपसरपंच देऊळवाडी), सुयश पाटील(युवा सेना उपतालुका प्रमुख),महादेव गुरव,विजय डोंगरे,सदानंद कदम आदिजण उपस्थित होते. या दवाखान्यात लिव्हर तपासणी,किडनी ,कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन ,शुगर इत्यादी तपासण्या होणार आहेत. तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *